लोकमत अंतिम फेरीत

By Admin | Published: January 13, 2015 01:04 AM2015-01-13T01:04:55+5:302015-01-13T01:04:55+5:30

अतिशय रोमहर्षक लढतीत गतविजेत्या लोकमत संघाने १० वेळचा विजेता हितवाद संघाला सोमवारी ६ गड्यांनी धूळ चारुन १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Lokmat in the final round | लोकमत अंतिम फेरीत

लोकमत अंतिम फेरीत

googlenewsNext

हितवादवर विजय : अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट सामने
नागपूर : अतिशय रोमहर्षक लढतीत गतविजेत्या लोकमत संघाने १० वेळचा विजेता हितवाद संघाला सोमवारी ६ गड्यांनी धूळ चारुन १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरच्यावतीने आयोजित ही स्पर्धा दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावर खेळविली जात आहे.
कर्णधार अमित खोडकेच्या ४५ धावा आणि नितीन पटारियाची अष्टपैलू कामगिरी हे लोकमतच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. हितवादने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली. २० षटकांत त्यांनी ६ गड्यांच्या मोबदल्यात १३८ धावा उभारल्या. यात विनय पांडे याने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. कमलेश वघीरेने ३० आणि प्रवीण लोखंडेने २२ धावा केल्या. लोकमतकडून नितीन पटारियाने २३ धावांत ३ तसेच सचिन खडके आणि शरद मिश्रा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात लोकमतच्या फलंदाजांनी आक्रमकता तसेच संयमाचा परिचय देत ६ गडी शिल्लक राखून लक्ष्य गाठले. शरद मिश्रा लवकर बाद झाल्यानंतर पटारियाने ३ गगनभेदी षटकारासह १३ चेंडूंत २५ व खोडकेने ४ चौकारांसह ४५ धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी केली. अटीतटीच्या क्षणी नितीन श्रीवासने २२ चेंडूंचा सामना करीत १ चौकार तसेच षटकारांच्या साह्याने नाबाद २९ धावांची व देवेंद्र सदावर्तीने ६ चेंडूंत नाबाद १४ धावांची खेळी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. पटारिया सामनावीर ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक
हितवाद : २० षटकांत ६ बाद १३८ धावा. (विनय पांडे नाबाद ४२, कमलेश वघीरे ३०, प्रवीण लोखंडे २२, नितीन पटारिया २३ धावांत ३, सचिन खडके व शरद मिश्रा प्रत्येकी १ बळी.)
लोकमत : १८.४ षटकांत ४ बाद १३९ धावा (ंअमित खोडके ४५, नितीन श्रीवास नाबाद २९, नितीन पटारिया २५, देवेंद्र सदावर्ती नाबाद १४, सुशीम कोले २५ धावांत २, प्रवीण लोखंडे व अनुपम तिमोथी प्रत्येकी १ बळी. )

Web Title: Lokmat in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.