लोकमतची स्पर्धा परीक्षा लेखमाला मार्गदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:52 AM2017-07-27T01:52:19+5:302017-07-27T01:54:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यूपीएससी, एमपीएससी आणि अशा स्पर्धा परीक्षांची अचूक तयारी करता यावी म्हणून लोकमत आणि दि युनिक अकॅडमीने नियमित लेखमाला सुरू केली आहे. बुधवारी विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लोकमतमधील लेखमालेच्या पानाचे प्रकाशन केले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाºया या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
हुडकेश्वर येथील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय आणि कुकडे लेआऊट येथील न्यू अपॉस्टोलिक इंग्लिश ज्यु. कॉलेज येथे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत लेखमालेचे पान समर्पित करण्यात आले. सुरुवातीला सेंट पॉल शाळेत झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, शाळेच्या प्राचार्या देवांगणा पुंडे, पल्लवी गायकी, अरविंद माणके, मोरेश्वर बावणे, नवीन फुलझेले, मेघा वाघमारे, नाझिया शेख आदी शिक्षक तसेच लोकमतचे वरिष्ठ विपणन व वितरण व्यवस्थापक मुश्ताक शेख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना राजाभाऊ टाकसाळे यांनी करिअरसाठी इंजिनिअर आणि डॉक्टर हा एकमेव पर्याय नसून त्याशिवाय असंख्य वाटा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निराश न होता यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून जिल्हाधिकरी, पोलीस आयुक्त किंवा तहसीलदार होण्याचे स्वप्न बघावे, असे आवाहन त्यांनी केले. लोक मत वृत्तपत्रातील चालू घडामोडींची माहिती आणि ही लेखमाला संपूर्ण ज्ञान देण्यासाठी उपयुक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांना करिअरसाठी नक्कीच लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुश्ताक शेख यांनी यावेळी प्रास्ताविक करताना लेखमालेची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
न्यू अपॉस्टोलिक शाळेत झालेल्या सोहळ्याच्या वेळी शाळेच्या प्राचार्या विनीता बॉवर, मुख्याध्यापिका वंदना बेंझामिन, पर्यवेक्षक मृणालिनी आपटे यांच्यासह स्वाती चांदे, ज्योत्स्ना रागीट, मेधा भांडारकर, शिल्पा आणेराव आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विनीता बॉवर यांनी लोकमतच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मोबाईल आणि संगणक हॅँग होऊ नये म्हणून त्यांना वारंवार अपडेट करावे लागते. विद्यार्थ्यांचेही ज्ञान अपडेट ठेवण्यासाठी ही लेखमाला अतिशय फायदेशीर आहे.
त्यामुळे करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी फाईलमध्ये या लेखमालेचे कात्रण सांभाळून ठेवावे आणि त्यातून अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. लोकमतच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
लेखमालेत विद्यार्थ्यांसाठी हे असेल
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी या लेखमालेत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक तसेच यशस्वी उमेदवारांद्वारे विस्तृत विवेचन करण्यात येईल. विषयाचे आकलन, अभ्यासाची पद्धत, संदर्भ साहित्याच्या निवडीसह अचूक मार्गदर्शन तसेच विषय, घटक -उपघटकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा या माध्यमातून करण्यात येईल. स्वयंअध्ययन करणाºया विद्यार्थ्यांनाही या लेखमालेतून पुरेपूर मार्गदर्शन मिळणार असून परीक्षेदरम्यान येणाºया तणावाचे निराकरण करण्याचे आणि वरचा गुणानुक्रम प्राप्त करण्याच्या टीप्स विद्यार्थ्यांना मिळणार आहे.