लोकमत मदतीचा हात : मुलाला वाचविण्यासाठी वडिलाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:29 PM2019-02-26T23:29:53+5:302019-02-26T23:33:45+5:30

मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी वडिलांनी दिवस-रात्र एक केले. ड्रायव्हर म्हणून राबराब राबले. मुलानेही तेवढ्याच मेहनतीने सिव्हिलमधून ‘बीई’चे शिक्षण पूर्ण केले. आता लवकरच नोकरी लागेल आणि घराचा आधार बनेल या अपेक्षेत असतानाच नियतीचे चक्र फिरले. गेल्या आठवड्यात मुलाचा अपघात झाला. पोट आणि कंबरेच्या हाडाचा चुरा झाला. दोन शस्त्रक्रियांमध्येच वडिलांचे पैसे संपले. डॉक्टरांनी आणखी दोन शस्त्रक्रिया सांगितल्या, परंतु त्यासाठी लागणारे चार लाख रुपये त्यांच्यासाठी मोठी रक्कम आहे. दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे.

Lokmat help hands: father's struggle to save son | लोकमत मदतीचा हात : मुलाला वाचविण्यासाठी वडिलाची धडपड

लोकमत मदतीचा हात : मुलाला वाचविण्यासाठी वडिलाची धडपड

Next
ठळक मुद्देशस्त्रक्रियेसाठी हवी आर्थिक मदत : डॉक्टरांनी सांगितला चार लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी वडिलांनी दिवस-रात्र एक केले. ड्रायव्हर म्हणून राबराब राबले. मुलानेही तेवढ्याच मेहनतीने सिव्हिलमधून ‘बीई’चे शिक्षण पूर्ण केले. आता लवकरच नोकरी लागेल आणि घराचा आधार बनेल या अपेक्षेत असतानाच नियतीचे चक्र फिरले. गेल्या आठवड्यात मुलाचा अपघात झाला. पोट आणि कंबरेच्या हाडाचा चुरा झाला. दोन शस्त्रक्रियांमध्येच वडिलांचे पैसे संपले. डॉक्टरांनी आणखी दोन शस्त्रक्रिया सांगितल्या, परंतु त्यासाठी लागणारे चार लाख रुपये त्यांच्यासाठी मोठी रक्कम आहे. दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे.
सौरभ विनायक मुदाफळे (२२) रा. सर्वश्रीनगर उमरेड रोड दिघोरी. त्या मुलाचे नाव.
सौरभचे वडील विनायक ड्रायव्हर आहेत. सध्या ओला कॅब चालवितात. विनायक यांना दोन मुले. मोठा मुलगा सौरभ. आपण चांगले शिक्षण घ्यावे म्हणून वडील करीत असलेली धडपड तो पाहत होता. म्हणून त्याने लवकर नोकरी मिळेल या आशेने सिव्हिलमध्ये ‘बीई’ अभ्यासक्रमाची निवड केली. गेल्याच वर्षी त्याने ‘बीई’ पूर्ण केले. आता नोकरी लागेल या अपेक्षेने घरात आनंदाचे वातावरण होते. काही महिन्यांपूर्वी विनायक यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओप्लास्टी केली. काही दिवस वडिलांचे काम बंद होते. वडिलाच्या उपचारात मोठा पैसा खर्च झाल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली. सौरभने नोकरी मिळेपर्यंत फोटोग्राफीला व्यवसाय म्हणून निवडले. २१ फेब्रुवारी रोजी तो फोटोग्राफीच्या ऑर्डरवर जात असताना खामला चौकात दुचाकी घसरली. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने सौरभला जोरदार धडक दिली. लोकांनी त्याला तातडीने समोरच्याच मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोन शस्त्रक्रिया केल्या. परंतु आणखी दोन मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. चार लाख रुपये खर्चाचे इस्टिमेट दिले. तेव्हापासून वडील पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु एवढा पैसा उभा करणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास मुलावर उचपार होतील ही एकमेव आशा त्यांना आहे.
हवे मदतीचे बळ
या कुटुंबाला समाजाच्या आर्थिक मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. विनायक मुदाफळे यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी भारतीय स्टेट बँक, शाखा ताजबाग उमरेड रोड, खाता क्रमांक ३०८८३३७३३८२ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. याचा आयएफएससी कोड क्र. एसबीआयएन००१६०९७ आहे. मुदफाळे यांना ८७६६४३९२५६ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

Web Title: Lokmat help hands: father's struggle to save son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.