लोकमत इम्पॅक्ट : नागपुरातील ‘ते’ खांब हटविण्यासाठी ४१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:18 PM2018-11-14T23:18:47+5:302018-11-14T23:21:01+5:30

शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.

Lokmat Impact: 41 crore to demolish 'to' pillars in Nagpur | लोकमत इम्पॅक्ट : नागपुरातील ‘ते’ खांब हटविण्यासाठी ४१ कोटी

लोकमत इम्पॅक्ट : नागपुरातील ‘ते’ खांब हटविण्यासाठी ४१ कोटी

Next
ठळक मुद्देशहरात हजारहून अधिक धोकादायक खांब : जनतेकडून घेण्यात आले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.
मनपाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे २००१-०२ मध्ये शहरात ‘आयआरडीपी’अंतर्गत रस्ते रुंदीकरणादरम्यान रस्त्यांच्या मध्ये आलेले १ हजार ८७ खांब हटले नव्हते. महावितरण व मनपा यासाठी आवश्यक असलेल्या ९१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अर्धाअर्धा उचलतील, असे २०११ मध्ये निश्चित झाले. महावितरणने वीज नियामक आयोगाकडून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षांपर्यंत वीज बिलांच्या माध्यमातून ९ पैसे प्रति युनिटप्रमाणे जनतेकडून वसुली केली. परंतु मनपा-महावितरणने केवळ प्रत्येकी २० कोटी ५० लाख रुपयेच खर्च केले. ४१ कोटींचे काम झाल्यावर खांब हटविणेच बंद करण्यात आले. ५० कोटींची कामे प्रशासकीय प्रक्रियेत अडकली आहेत. यादरम्यान नवीन सिमेंट मार्ग बनविल्यामुळे काही खांब हटले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मनपाच्या पुढाकारातून महावितरणने खांब हटविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. कंपनीच्या चमूने रस्त्यांचे सर्वेक्षण करुन ५३ कोटी ३२ लाख रुपयांचे काम निश्चित केले. यातील काही जागांवर खांब हटविण्याची आवश्यकता नसल्याची बाबदेखील लक्षात आली. अखेर या कामासाठी ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामासाठी महावितरणने अगोदरच जनतेकडून वीजबिलांच्या माध्यमातून २० कोटी ५० लाख रुपये वसूल केले आहे. तर मनपाचा दावा आहे की त्यांना यासाठी राज्य शासनाकडून अनुदान व कर्ज प्राप्त झाले आहे.

कुठले खांब हटणार ?
या माध्यमातून शहरातील विविध भागांतील खांब हटविण्यात येतील. यात रिंग रोड ते रामेश्वरी, वर्धमान नगर चौक ते विकास चौक, बोरगांव ते अवस्थी नगर, क्रीड़ा चौक ते तुकड़ोजी पुतळा, १० नंबर पूल ते आंबेडकर चौक, आंबेडकर रोड ते मनपा तलाव, छिंदवाड़ा रोड ते काटोल मार्ग, रेल्वे फीडर ते शहीद चौक, इतवारी रोड ते कामठी रोड, कामठी रोड ते अशोक चौक, म्हाळगी नगर से नरेंद्र नगर, ग्रेट नाग रोड ते जगनाड़े चौक, गजानन विद्यालय ते हुड़केश्वर मार्ग, दोसर भवन ते कब्रस्तान आणि बड़कस चौक ते सक्करदरा यामधील खांबांचा समावेश असेल.

Web Title: Lokmat Impact: 41 crore to demolish 'to' pillars in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.