लोकमतचा प्रभाव : नागपुरात  १.४९ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 08:16 PM2019-11-13T20:16:02+5:302019-11-13T20:17:15+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आणि ट्रान्सपोर्ट गॅरेजला सील ठोकण्यात आले.

Lokmat Impact : Aromatic tobacco seized in Nagpur | लोकमतचा प्रभाव : नागपुरात  १.४९ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त 

लोकमतचा प्रभाव : नागपुरात  १.४९ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त 

googlenewsNext
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : धडक कारवाई सुरू राहणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आणि ट्रान्सपोर्ट गॅरेजला सील ठोकण्यात आले.
एनडीएच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त माहितीच्या आधारे गोपला कॉम्प्लेक्स, खदान रोड, वाडी येथील एस.टी.सी. लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट गॅरेजची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ सुगंधित तंबाखूचा (विना लेबल निळे पॅकेट) २४८ किलो वजनाचा १,४८,८०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू वाहतुकीसाठी साठविलेला आढळून आला. या साठ्यातून नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित साठा अन्न सुरक्षा व मानद कायद्यातील तरतुदींनुसार जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
ट्रान्सपोर्टचे मालक सुभाष मोहनलाल बिश्नोई व कैलासचंद कानाराम बिश्नोई हे असून त्यांनी आपल्या ट्रान्सपोर्ट गॅरेजमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा वाहतुकीसाठी साठविल्याने सदर ट्रान्सपोर्ट गॅरेज सिलबंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, नागपूर येथील सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व महेश चहांदे तसेच नमूना सहायक अरूण सौदे यांनी केली.
जनआरोग्याचा विचार करता याप्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहील. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू व सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवणूक व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सहकार्य करावे आणि जनतेने विशेषत: युवा वर्गाने अशा प्रकारचे सेवन करून नये, असे शरद कोलते यांनी म्हटले आहे.

Web Title: Lokmat Impact : Aromatic tobacco seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.