लोकमत इम्पॅक्ट : नागपुरात शासकीय जागांवर वीजचोरी रोखण्यासाठी विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:16 PM2018-12-08T21:16:52+5:302018-12-08T21:17:41+5:30

शासकीय जागांवर होणाऱ्या कार्यक्रम, समारंभात होत असलेली वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने विशेष पथक तैनात केले आहे. यासोबतच संशयास्पद ठिकाणे चिन्हित करून त्या ठिकाणी आयोजनासाठी विजेचे अस्थायी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Lokmat Impact: Special squad for preventing power theft in government places in Nagpur | लोकमत इम्पॅक्ट : नागपुरात शासकीय जागांवर वीजचोरी रोखण्यासाठी विशेष पथक

लोकमत इम्पॅक्ट : नागपुरात शासकीय जागांवर वीजचोरी रोखण्यासाठी विशेष पथक

Next
ठळक मुद्देअस्थायी कनेक्शन घेऊन समारंभ करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय जागांवर होणाऱ्या कार्यक्रम, समारंभात होत असलेली वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने विशेष पथक तैनात केले आहे. यासोबतच संशयास्पद ठिकाणे चिन्हित करून त्या ठिकाणी आयोजनासाठी विजेचे अस्थायी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मनपाच्या जागांवर वीजचोरी होत असल्याबाबत लोकमतने गेल्या ६ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. एसएनडीएलने मनपाला दिलेल्या पत्राच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या पत्रानुसार शहरात जवळपास २० हॉल आणि ५० मैदाने वीजचोरीच्या रडारवर आहेत. माहीत असूनही एसएनडीएल कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहे. कारण चोरी करणारे आयोजन कार्यक्रम संपताच विजेच्या तारांवर टाकलेले हूक काढून ठेवतात. अशा परिस्थितीत समारंभादरम्यान कारवाई केल्यास नागरिक आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेता कारवाई होत नाही. एसएनडीएलने आसीनगर, धरमपेठ, धंतोली, हनुमाननगर, लकडगंज, मंगळवारी, नेहरूनगर आणि सतरंजीपुरा झोनला पत्र पाठवून माहिती दिली आहे की, त्यांच्या परिसरात खुले मैदान, शाळा आणि इतर ठिकाणी होत असलेल्या समारंभामध्ये अवैधपणे वीज वापरली जात आहे. यात लग्नसमारंभ आणि जन्मदिन समारंभाचाही समावेश आहे. जवळचे फीडर, पिलर बॉक्स, वीज खांब किंवा विजेच्या तारांवर थेट हूक टाकून वीजचोरी केली जात आहे.
आता एसएनडीएलने यावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. रोज सायंकाळी कंपनीचे कर्मचारी संशयास्पद ठिकाणांची पाहणी करतील. वीजचोरी होत असल्याचा संशय येताच पोलिसांच्या मदतीने लगेच कारवाई केली जाईल.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासोबतच संशयास्पद ठिकाणांच्या जवळपास राहणाऱ्या प्रभावशाली लोकांच्या भेटी घेऊन त्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून, वीजचोरी रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. कंपनीने स्थानिक नगरसेवकांना लग्नसमारंभासाठी नागरिकांना अस्थायी मीटर घेण्याचा सल्ला द्यावा, अशी विनंती केली आहे.
ही ठिकाणे आहेत संशयाच्या घेऱ्यात
एसएनडीएलने आपल्या परिसरातील जवळपास २० हॉल आणि ५० मैदाने चिन्हित केली आहेत. यात मनपा आसीनगर झोनजवळचे मैदानही सामील आहे. बिनाकी पॉवर हाऊस समोरील हॉल, छापरूनगर मैदान, महेंद्रनगराील शीतला माता मंदिराजवळचे मैदान, सिद्धार्थनगर येथील फारुखनगरचे मैदानही संशयाच्या घेऱ्यात आहे.

Web Title: Lokmat Impact: Special squad for preventing power theft in government places in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.