'लोकमत' समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलं वाटणारं हक्काचं वृत्तपत्र - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:04 PM2023-02-18T13:04:22+5:302023-02-18T13:05:11+5:30

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा

'Lokmat' is a newspaper that belongs to people of all walks of life - Devendra Fadnavis | 'लोकमत' समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलं वाटणारं हक्काचं वृत्तपत्र - देवेंद्र फडणवीस

'लोकमत' समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलं वाटणारं हक्काचं वृत्तपत्र - देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

नागपूर : अनेकदा हेड ऑफ टाईम्स जसं म्हणतो तसा लोकमत आपल्याला पाहता आलाय. प्रिट, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल सर्व प्रकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकमत पोहोचलाय. आज 'लोकमत'मध्ये काम करणारी आज तिसरी पिढी तयार झालीयं. यावेळी त्यांनी जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. लोकमतची परंपरा जी बाबूजींनी सुरू केलीय ती अविरत सुरू राहावी, हे त्यांचं स्वप्न साकार करत आज खऱ्या अर्थाने त्याच सिद्धांतावर काम करतेय. ज्या लोकांनी आपल्या कार्याने लोकमतच्या यशात सहकार्य केलं त्यांचा सत्कार आज करण्यात आलाय त्यांनाही आपण धन्यवाद देत असल्याचे भाव फडणवीस यांनी व्यक्त केले. 

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या महासोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. 

पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा; विजय दर्डा यांची अमित शाह यांच्याकडे मागणी

यावेळी टपाल खात्याने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच, नागपूर ॲन्थम- नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’चे लोकार्पणही करण्यात आले. लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात 'लोकमत'चा आत्तापर्यंतचा प्रवास व वर्तमान व भविष्यातील योजना याबबत माहिती दिली. पत्रकार हे देशाचे पहारेकरी, सरदार वल्लभभाई पटेलांची छबी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. लोकमतच्या प्रवासात ज्यांनी आपलं अमुल्य योगदान दिलं अशा वरिष्ठ पत्रकार, संपदाकांच्या कार्याचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: 'Lokmat' is a newspaper that belongs to people of all walks of life - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.