लोकमत महामॅरेथॉनचा रविवारी थरार; राज्यातील धावपटूंसह हजारो नागपूरकरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:08 AM2018-02-10T10:08:59+5:302018-02-10T10:13:28+5:30

११ फेब्रुवारीचा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. निमित्त असेल भोजवानी फूडस् प्रस्तुत ‘नागपूर महामॅरेथॉन’चे. कस्तूरचंद पार्क येथून रविवारी (११ फेब्रुवारी) महामॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात होईल.

Lokmat Mahamarethan's thunder on Sunday; Thousands of Nagpur participants including the runners in the state | लोकमत महामॅरेथॉनचा रविवारी थरार; राज्यातील धावपटूंसह हजारो नागपूरकरांचा सहभाग

लोकमत महामॅरेथॉनचा रविवारी थरार; राज्यातील धावपटूंसह हजारो नागपूरकरांचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि अधिकारीही धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ११ फेब्रुवारीचा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणाऱ्या तब्बल साडेसात हजार धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहताना दिसणार आहेत. निमित्त असेल भोजवानी फूडस् प्रस्तुत ‘नागपूर महामॅरेथॉन’चे. ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क येथून रविवारी (११ फेब्रुवारी) महामॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात होईल.

गडकरी दाखविणार हिरवी झेंडी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुख्य उपस्थितीत होणाºया सोहळ्यात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधीर पारवे, आ. आशिष देशमुख, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ, परिणय फुके, आ. जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी महापौर विकास ठाकरे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, मनपा अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे, सीआरपीएफचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतिजा आदी पाहुणे उपस्थिती दर्शविणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटूंचा सहभाग तसेच सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष दलातील धावपटूंसाठी विशेष दिले जाणारे बक्षीस हेदेखील प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.२१ कि.मी. अर्धमॅरेथॉन, तर १० कि.मी. ‘पॉवर रन’ शिवाय फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ कि .मी. फन रन आणि ५ कि .मी. अंतर अशा विविध चार गटात आयोजन करण्यात येत आहे.
लोकमत समूहाने यंदा महाराष्ट्रात चार शहरात महामॅरेथॉनचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील धावपटूंच्या उदंड प्रतिसादामुळे नाशिक तसेच औरंगाबाद येथील महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंनी सहभाग निश्चित केला होता.
नागपुरात रंगणारी महामॅरेथॉन नागरिक आणि खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अनुभवाचा ठेवा ठरणार आहे. सर्व शहर या मॅरेथॉननिमित्त एकत्रित यावे, आपापसात जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकमत समूहाने ही महामॅरेथॉन आयोजित केली आहे.
लोकप्रतिनिधी, मान्यवर धावणार
लोकमत महामॅरेथॉनमध्ये मान्यवर लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर सनदी अधिकारी धावणार आहेत. त्यात रामटेकचे खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, महानगर पालिका आयुक्त अश्विन मुद्गल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत आदींचा प्रामुख्याने समावेश राहील.
दिव्यांग रन सकाळी ७.४५ वाजता
लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत एक किलोमीटरची दिव्यांग रन होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात सकाळी ७.४५ वाजता होईल. या स्पर्धेत विविध संस्थांचे १०० विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार असून त्याता ६ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असणार आहे.

Web Title: Lokmat Mahamarethan's thunder on Sunday; Thousands of Nagpur participants including the runners in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.