‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहीम, आज सात ठिकाणी शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:01+5:302021-07-04T04:07:01+5:30

झिंगाबाई टाकळी झिंगाबाई टाकळी येथील नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, झिंगाबाई टाकळीचा राजा गणपती माझा, गीतांजली शारदा उत्सव मंडळ आणि ...

‘Lokmat Raktacha Naat’ campaign, camps at seven places today () | ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहीम, आज सात ठिकाणी शिबिर ()

‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहीम, आज सात ठिकाणी शिबिर ()

Next

झिंगाबाई टाकळी

झिंगाबाई टाकळी येथील नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, झिंगाबाई टाकळीचा राजा गणपती माझा, गीतांजली शारदा उत्सव मंडळ आणि गुरुदेव समभाव सेवा मंडळातर्फे झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत नगरातील श्री गुरुदेव समभाव सेवा मंडळात सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. झिंगाबाई टाकळी येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि कोरोनामुळे निधन झालेले जगदीश अंबादास कोहळे, रवी पुंडलिकराव वराडे, नामदेव भोरकर, राजेश मधुकर राऊत, रवी गुलाबराव तांदुळकर यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

पर्यावरण व निसर्ग संस्था, घोगली

पर्यावरण व निसर्ग संस्था घोगलीतर्फे ग्रामपंचायत बेसा, बेलतरोडी व पिपळच्या संयुक्त विद्यमाने बेसा येथील स्वामिधाम श्री स्वामी समर्थ मंदिरात सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात बेसाचे सरपंच सुरेंद्र बानाईत, पिपळाचे सरपंच नरेश भोयर, माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य किशोर वानखेडे, स्वामिधामचे अध्यक्ष दिनकर कडू, अर्ध्य सैनिक कॅन्टीनचे संचालक राहुल मानकर, चित्रकला व शिल्प संचालनालयाचे निरीक्षक संदीप डोंगरे, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे निवृत्त संचालक राहुल गजभिये, आर्किटेक्ट अनिकेत ठाकूर, दामोदर कटरे, पर्यावरण व निसर्ग संस्थेचे सचिव मधुकर सुरवाडे, कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के, अभय पवार तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.

संदेश फाउंडेशन, संदेश दवा बाजार

संदेश फाउंडेशनच्या वतीने संदेश दवा बाजार सी. ए. रोड येथे सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी गोपाल अग्रवाल, अतुल चौराई, राजू आया, राकेश हेमराजानी, रिंकू अग्रवाल, कैलाश लिलडिया, लाला लुनावत, धवल पोद्दार, पुरुषोत्तम लिलडिया, राजेश छाबरानी, संजीव खुडे, गिरीष लिलडिया प्रयत्न करीत आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेर

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान सावनेर येथील आयएमए सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सावनेर नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते होईल. जीवन ज्योती ब्लड बँक नागपूरचा चमू लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबवित आहे. शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर विजय धोटे, इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश कुंभारे, सचिव डॉ. परेश झोपी यांनी केले आहे.

शिवमित्र परिवार, ओमनगर कोराडी

शिवमित्र परिवाराचे योगेश वरुडकर आणि भाजप उत्तर नागपूर मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी श्री महर्षी बाबा मंदिर ओमसाईनगर येथे सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराला नागपूर महानगरपालिकेचे सभापती महेंद्र धनविजय, विक्की कुकरेजा, नगरसेविक सुषमा चौधरी, प्रेमिला मथरानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोनामुळे स्वर्गवासी झालेल्या शिवमित्र परिवारातील लोकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी सतीश पवार, प्रवीण लांडे, संजय जाधव, प्रवीण पायतोडे, स्वप्निल बोरोडे, विजय सुखे उपस्थित राहणार आहेत.

शिव चॅरिटेबल ट्रस्ट, पतंजली योग समिती मौदा

मौदा येथील शिव चॅरिटेबल ट्रस्ट व पतंजली योग समितीच्या वतीने मौदा येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन शिव चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, पतंजली योग समितीचे पदाधिकारी राजू सोमनाथे, देविदास कुंभलकर, देवेंद्र सोनटक्के, डॉ. सुनील बोरकर, दिनेश ढोबळे, ईश्वर पत्रे, मोनिका ठाकरे, नरेंद्र बाळबुधे, नंदकिशोर कनोजे, तुकाराम लुटे यांनी केले आहे.

आकाशझेप फाउंडेशन, पारशिवणी

पारशिवनी येथील आकाशझेप फाउंडेशनच्या वतीने संत तुकाराम सभागृह पारशिवणी येथे सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आकाशझेप फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

..............

Web Title: ‘Lokmat Raktacha Naat’ campaign, camps at seven places today ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.