लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळा थाटात

By admin | Published: January 13, 2016 03:32 AM2016-01-13T03:32:48+5:302016-01-13T03:32:48+5:30

लोकमत सखी मंच आणि युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ....

Lokmat Sakhi Forum, 'Sakhi Samman Award' ceremony | लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळा थाटात

लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळा थाटात

Next

गौैरव : लोकमत सखी मंच आणि युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणारे ‘लोकमत सखी सन्मान अवॉर्ड’ मंगळवारी एका देखण्या सोहळ्यात प्रदान करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भरगच्च उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात डावीकडून बसलेल्या जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा, रियल इन्स्टिट्यूटचे संचालक अजित शृंगारपुरे, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा वंदना शर्मा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुळकर्णी, रेखा नेचर क्युअर सेंटरच्या रेखा तवर, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, लोकमत सखी मंचची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुळकर्णी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, निर्मल उज्ज्वल पतसंस्थेचे संस्थापक सचिव प्रमोद मानमोडे, युनिक स्लिम पॉर्इंटच्या संचालिका डॉ. रिचा जैन, रियल इन्स्टिट्यूटचे चेअरमन शंकर बरडे तर मागे उभे असलेल्या लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी आणि लोकमत सखी सन्मान अवॉर्डच्या विजेत्या सीमा गोडबोले, वाय. रमणी, नलिनी चव्हाण, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आरती सिंग, डॉ. सुवर्णा हुबेकर, कल्पना जाधव, समीक्षा गणवीर त्यांच्या सन्मानचिन्हासह. बाजूला लोकमतचे संपादक दिलीप तिखिले आणि लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र.

Web Title: Lokmat Sakhi Forum, 'Sakhi Samman Award' ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.