लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचा ‘लकी ड्रॉ’ जाहीर
By Admin | Published: February 20, 2017 02:11 AM2017-02-20T02:11:24+5:302017-02-20T02:11:24+5:30
लोकमतच्या वतीने १ जुलै ते १० आॅक्टोबर कालावधीत घेण्यात आलेल्या ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेचा लकी ड्रॉ लोकमत भवनात काढण्यात आला.
नागपूर : लोकमतच्या वतीने १ जुलै ते १० आॅक्टोबर कालावधीत घेण्यात आलेल्या ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेचा लकी ड्रॉ लोकमत भवनात काढण्यात आला.
याप्रसंगी नागपूर शहरातील गांधीबाग येथील पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या प्राचार्य नुरजहाँ राजपूत, विदर्भ बुनियादी हायस्कूलचे मुख्याध्यापक दौलतराव कारेमोरे, स्वामी अवधेशानंद स्कूलच्या प्राचार्य डॉ. निलिजा उमेकर, टी. बी. आर. ए. एन. एस. मुंडले हायस्कूलच्या पर्यवेक्षिका रश्मी पाणीग्रही, न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल महालच्या मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे, दयारामजी वडे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक गजानन मोरोलिया, पं. बच्छराज हायस्कूलचे पर्यवेक्षक दिलीप भांडारकर, श्री विवेकानंद विद्यालयाचे पर्यवेक्षक राजू रेवतकर, नरेश कामडे, पाचपावलीतील ब्लू स्टार कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका डॉ. अनिता भुते, सुभाषचंद्र बोस उच्च प्रा. शाळा कळमना येथील शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कठाणे, हडस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. एम. कुंडले यांच्या उपस्थितीत ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यावेळी लोकमतचे प्रसार महाव्यवस्थापक संतोष चिपडा, लोकमतचे सहाय्यक संपादक गजानन जानभोर, वितरण विभागाचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक मुश्ताक शेख, उपव्यवस्थापक शिरिष मोरस्कर, विलास तिजारे, इम्रान हुसेन, अमित खोडके उपस्थित होते. संचालन मुश्ताक शेख यांनी केले.(प्रतिनिधी)