लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९;  श्रेया घोषालच्या जादूभरल्या स्वरांनी रंगली संध्याकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 09:43 PM2019-03-23T21:43:42+5:302019-03-23T21:45:01+5:30

जादू है नशा है.. असं म्हणत रंगमंचावर अवतरलेल्या श्रेया घोषालने आपल्या मधाळ दमदार आवाजात एकसे एक गाणी सादर करीत नागपूरची शनिवारची संध्याकाळ स्वरमंत्रांनी भारून टाकली.

Lokmat Sur Jyotsna National Music Awards 2019; Sharia Ghoshal's magic | लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९;  श्रेया घोषालच्या जादूभरल्या स्वरांनी रंगली संध्याकाळ

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९;  श्रेया घोषालच्या जादूभरल्या स्वरांनी रंगली संध्याकाळ

Next
ठळक मुद्देकिंजल चॅटर्जीने दिली दमदार साथ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जादू है नशा है.. असं म्हणत रंगमंचावर अवतरलेल्या श्रेया घोषालने आपल्या मधाळ दमदार आवाजात एकसे एक गाणी सादर करीत नागपूरची शनिवारची संध्याकाळ स्वरमंत्रांनी भारून टाकली. चमचमत्या लक्षावधी
लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९ च्या वितरण सोहळ््याच्या निमित्त आयोजित संगीत रजनीत ख्यातनाम पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी गाजलेल्या गाण्यांना सादर केले. त्यांना बॉलीवूडमधील गायक किंजल चॅटर्जी यांनी तितकीच दमदार साथ दिली.
सोनेरी चांदण्यांचा इव्हिनिंग गाऊन ल्यायलेल्या श्रेया घोषालने आल्या क्षणीच रंगमंचाचा ताबा घेत श्रोत्यांच्याही मनाचा ठाव घेतला. सैराट, बाजीराव मस्तानी, धडक यासह अनेक नव्या चित्रपटांमधील गाणी सादर करत त्यांनी कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवत नेली.
कम आॅन नागपूर, अशा श्रेयाच्या जोरकस आवाहनाला नागपूरकर श्रोत्यांनीही टाळ््या आणि शिट्ट्यांनी उत्तर दिले. कधी ठुमकत्या तर कधी कधी अवखळ गाणी सादर करत श्रेयाने श्रोत्यांना ठेका धरायला भाग पाडले.
जुन्या काळातील ज्येष्ठ गायकांच्या उत्तमोत्तम गाण्यांना गाऊन कार्यक्रमाची उंची अधिकाधिक उंचावत नेली.
यात नाम गुम जायेगा, बडी लंबी जुदाई, कुछ तो लोग कहेंगे, तेरे मेरे मिलन की रैना, ये कहाँ आ गये हम यूंही साथ साथ चलते चलते, तुम जो मिल गये हो, तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नही.. अशा अविस्मरणीय गाण्यांना सादर केले. त्यांच्या स्वराच्या मंत्रमुग्ध लहरींनी अवघे स्टेडियम भरून गेले होते.

Web Title: Lokmat Sur Jyotsna National Music Awards 2019; Sharia Ghoshal's magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.