लोकमत, सूर्यदत्ता फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:25 AM2020-12-13T04:25:04+5:302020-12-13T04:25:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह आणि पुणे येथील सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्यावतीने नागपुरातील विविध शाळांतून दहावीच्या परीक्षेत ...

Lokmat, Suryadatta Foundation honors meritorious | लोकमत, सूर्यदत्ता फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

लोकमत, सूर्यदत्ता फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह आणि पुणे येथील सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्यावतीने नागपुरातील विविध शाळांतून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंतांचा गौरव शनिवारी करण्यात आला.

लोकमत भवन येथे शनिवारी सकाळी ११ वाजता हा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डॉ. रिचा जैन, डॉ. अविनाश गावंडे, युवा व्यवसायी अक्षय शहारे, लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उमेदीच्या काळातील ९६ हजार तासांचे महत्त्व विषद करून सांगितले. हे तास आपल्या बुद्धिमत्तेने व कौशल्याने पाच लाख तास कसे करता येतील, याचे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. जेव्हा गरज असेल तेव्हा मार्गदर्शन मिळाले की विद्यार्थी ध्येय गाठण्यास तत्पर असतात. तेच प्रयत्न आम्ही करतो आहोत. आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायची आहे. टाळेबंदीत खूप वेळ रिकामा गेला आणि ऑनलाईनमध्ये घालवला. आता शाळा, कॉलेजेस सुरू होतील तर मोबाईलला विसरा आणि आपला वेळ सकारात्मक विषयांमध्ये द्या. शंकांचे निरसन होण्यासाठी सकारात्मकता गरजेची आहे. त्यासाठी नोईंग, बिईंग आणि डूईंग ही त्रिसूत्री आयुष्यात जपा असे आवाहन चोरडिया यांनी यावेळी केले. यावेळी गिरीश गांधी यांनी मार्गदर्शन करताना सुविधांचा चेंडू तुमच्या हातात असल्याचे स्पष्ट करत, त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवण्याचे आवाहन केले. काम केल्याने माणूस मरत नाही तर जास्त जगतो. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, असे ते म्हणाले. डॉ. अविनाश गावंडे यांनी मुलांना मिसयुज आणि डिसयुजमधील फरक स्पष्ट करून सांगितले. कोरोनाच्या काळात एवढे शिकता आले की आता पुढचे आयुष्य सोपे झाले आहे. तो धडा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र तसेच धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रमाणपत्राचे वाचन धाडीवाल यांनी केले. प्रास्ताविक लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले यांनी केले तर संचालन पुनम तिवारी-महात्मे यांनी केले.

सूर्यभूषण व सूर्यगौरव पुरस्कार २०२०

सूर्यदत्ता फाऊंडेशनतर्फे सूर्यभूषण २०२० हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार वनराईचे विश्वस्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना प्रदान करण्यात आला तर सूर्यगौरव २०२० हा राष्ट्रीय पुरस्कार लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. रिचा जैन, अक्षय शहारे यांना प्रदान करण्यात आला.

हे ठरले कौतुकाचे मानकरी

अभय पाटील (सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल), अक्षय मेश्राम (इंग्लिश इएनजीजी स्कूल), अंजली रंभाड (माऊंट कार्मेल स्कूल), अनुष्का कार्लेकर (माऊंट लिटेरा स्कूल), अर्कजा देशमुख (संजूबा हायस्कूल), अथर्व झाडे (एस.एस. इंटरनॅशनल स्कूल), आयुषी घ्यार (रॉयल गोंडवाना स्कूल), चैतन्य सिरास (आर.एस. मुंडले स्कूल), चिन्मयी गाठबांधे (पं. बच्छराज स्कूल), गुरुप्रसाद साठोने (भोंसला मिलिटरी स्कूल), हर्षा कोडे (साऊथ पाॅईंट स्कूल), हिमांश्री गावंडे (साऊथ पब्लिक स्कूल), इस्माईल शेख (राजेंद्रप्रसाद स्कूल), जयकुमार घोटकर (श्री सत्यसाई कॉन्व्हेंट), कनक बोंद्रे (स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल), खुशबू शेख (पं. नेहरू कॉन्व्हेंट), लावण्या कावळे (संजूबा हायस्कूल), मैथिली ढगे (सी.जी. वंजारी), मानसी सावरकर (श्रीमती सारडा इंग्लिश स्कूल), मृणाल मानकर (माँटफोर्ड स्कूल), पार्थ चव्हाण (सोमलवार स्कूल), प्रसन्ना मेंढे (स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल), प्रिया भांडारकर (राजेंद्र हायस्कूल), पूर्वा पनपालिया (पोदार इंटरनॅशनल), रिदम रंगारी (एमकेएच संचेती पब्लिक स्कूल), रुचिका काळे (टीव्हीएम स्कूल), संगीत ढाबरे (माँटफोर्ड स्कूल), शेजल वसू (सेंट ॲनी इंग्लिश स्कूल), वैष्णवी भैसारे (केंद्रीय विद्यालय), वैष्णवी मेंढे (अतुलेश कॉन्व्हेंट), वरेण्य पौनीकर (सोमलवार निकालस स्कूल), विक्रांत सिंग (पोदार इंटरनॅशनल), योगेश्वरी खेडकरकर (श्रीराम विद्यालय)

Web Title: Lokmat, Suryadatta Foundation honors meritorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.