‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञाचा आज प्रारंभ, दिग्गजांच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:48 AM2021-07-02T07:48:26+5:302021-07-02T07:48:44+5:30
‘लोकमत’ भवन येथे ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते होईल, तर औरंगाबाद येथे सकाळी १० वाजता ‘लोकमत’ भवनात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते प्रारंभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/औरंगाबाद : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्रामसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या महायज्ञाचा प्रारंभ शुक्रवारी नागपुरात सकाळी १०.३० वाजता स्व. जवाहरलाल दर्डा कला अकादमी, ‘लोकमत’ भवन येथे ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते होईल, तर औरंगाबाद येथे सकाळी १० वाजता ‘लोकमत’ भवनात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते प्रारंभ होणार आहे.
नागपुरात प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आ. प्रवीण दटके (विधान परिषद सदस्य), आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार उपस्थित राहतील.
औरंगाबादेत प्रारंभप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.