लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:44 AM2018-10-12T10:44:21+5:302018-10-12T10:44:55+5:30

सावधान...! फेसबुकवर जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते.

Lokmat's warning was right; The ISI was active | लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त

लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त

Next
ठळक मुद्देफेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावधान...! फेसबुकवर जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे झाले तर तुम्हाला हेरगिरीच्या आरोपात अटकही होऊ शकते, असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते.
भारताच्या उण्यावर असलेल्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून हा प्रयोग केला जात आहे, असेही लोकमतने या वृत्तात म्हटले होते. निशांत अग्रवालला मिलिटरी इंटेलिजन्स आणि यूपी एटीएसने अटक केल्यानंतर हे वृत्त अक्षरश्: खरे ठरले.
सोशल मीडियाच्या प्रेमात तरुणाई वेडावल्यागत वागत आहे. ज्याचे प्रत्यक्षात कधी तोंड बघितले नाही आणि ज्याला भविष्यात प्रत्यक्ष कधी भेटण्याची शक्यता नाही, अशी मंडळीसोबत अनेक जण रोज आॅनलाईन संपर्कात राहतात. फेसबुकवर दिसणाऱ्या आकर्षक चेहºयावर भाळून त्याच्यासोबत तासन्तास चॅटिंग करतात. त्यांच्यासोबत संवेदनशील माहितीचे आदानप्रदान करतात. फेसबुकची चलती बघून शत्रू देशाच्या गुप्तचर संस्थांनी हेरगिरीसाठी विशिष्ट जणांना टार्गेट करणे सुरू केले आहे. आकर्षक चेहरा अन् प्रभावी प्रोफाईल (फेक आयडी) अपलोड करून संवेदनशीलस्थळी काम करणाºया व्यक्तीला शत्रू राष्टाचा हेर आॅनलाईन जाळ्यात गुंतवतो आणि त्याच्याकडून नियमित पाहिजे ती संवेदनशील माहिती बेमालूमपणे काढून घेतो. पाकिस्तानी आयएसआयची ही पद्धत आहे. बनावट नावाने फेसबुक आयडी तयार करून बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्राला अशाच पद्धतीने आयएसआय एजंटने जाळ्यात ओढल्याचेही या वृत्तात सविस्तरपणे प्रकाशित केले होते.
लोकमतचे हे वृत्त प्रकाशित होऊन तीन दिवस झाले अन् चौथ्या दिवशी पाकिस्तान तसेच अमेरिकेला शक्तिशाली ब्रह्मोस मिसाईलचा डाटा देण्याच्या आरोपाखाली निशांत अग्रवालच्या नागपुरात एटीएसने मुसक्या बांधल्या. फेसबुकच्या माध्यमनातूनच त्याला टार्गेट करण्यात आले होते. त्याच्यावर आयएसआयने तसाच लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तासारखाच ट्रॅप लावला होता.

लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल
या कारवाईने नागपूरच नव्हे तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हा एकच विषय नागपुरात गेल्या चार दिवसांपासून चर्चेला आहे. लोकमतने कारवाईच्या चार दिवसांपूर्वीच आयएसआय सक्रिय झाल्याचे तसेच फेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो, हे वृत्त दिले होते त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोकमतच्या वृत्ताचे कात्रणही सोशल मीडियावर अनेकांनी व्हायरल केले आहे.

Web Title: Lokmat's warning was right; The ISI was active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.