लंडनच्या महिलेने नागपूरच्या व्यावसायिकाला अडीच लाखांने फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:31 AM2019-08-29T00:31:00+5:302019-08-29T00:32:50+5:30

नागपुरातील एका व्यावसायिकाला लंडनच्या महिलेची ‘फ्रेण्डशिप रिक्वेस्ट एक्सेप्ट’ करणे महागात पडले. या कथित महिलेने व्यावसायिकास अडीच लाखाचा चुना लावला.

London woman cheats Nagpur businessman by two and a half lakhs | लंडनच्या महिलेने नागपूरच्या व्यावसायिकाला अडीच लाखांने फसवले

लंडनच्या महिलेने नागपूरच्या व्यावसायिकाला अडीच लाखांने फसवले

Next
ठळक मुद्देनऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल‘फ्रेण्डशिप रिक्वेस्ट एक्सेप्ट’ करणे महागात पडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील एका व्यावसायिकाला लंडनच्या महिलेची ‘फ्रेण्डशिप रिक्वेस्ट एक्सेप्ट’ करणे महागात पडले. या कथित महिलेने व्यावसायिकास अडीच लाखाचा चुना लावला.नऊ महिन्यांपूर्वी घडलेल्या याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी मकरंद प्रकाश चांदूरकर (४५) रा.अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट हे रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. ही घटना १५ नोव्हेंबर २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडली. चांदूरकर हे शेअर ट्रेडिंग आणि रियल इस्टेटचे व्यावसायिक आहेत. त्यांना लंडन येथील जेनिफर गॉरेढ या महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. मकरंद व्यावसायिक असल्याने त्यांनी आधी जेनिफरचे प्रोफाईल तपासले. त्यासुद्धा रिअल इस्टेटच्या व्यवसायात असल्याचे दिसले. एकाच व्यवसायात असल्याने मकरंद यांनी जेनिफरची फ्रेण्ड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. मैत्रीनंतर जेनिफरने भारतात येऊन व्यवसाय करण्याची इच्छा दाखविली. त्यावर मकरंद यांनी उपलब्ध जागेबद्दल माहिती करून दिल्यानंतर जेनिफरने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली.
१६ नोव्हेंबर २०१८ रोजी आपण लंडन येथून मुंबईमार्गे दिल्लीला येत असल्याचे जेनिफरने मकरंदला सांगितले. तसेच विमानाचे तिकीट, विमानात बसल्याचा व्हिडिओ पाठवून मकरंद यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, काही तासांनीच मकरंद यांना एक फोन आला.
मोबाईलधारकाने दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकारी असल्याचे सांगून जेनिफर हिने पाच लाख पौंडचा डीडी विनापरवागी व नोंदणी न करता भारतात आणला. डीडीच्या नोंदणीकरिता ७६ हजार ७०० रुपये लागतील, असे मकरंदला सांगितले, त्यावर जेनिफर हिनेसुद्धा उपरोक्त रक्कम लागेल, असे सांगितले. जेनिफर आपल्या म्हणण्यावरून भारतात आली, आता ती अडचणीत आहे, त्यामुळे तिला मदत केली पाहिजे, या उद्देशाने मकरंद यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात ७६,७०० रुपयांची रक्कम पाठविली. त्यानंतर पुन्हा आरोपींनी फोन करून डीडीचा मनी लाँड्रिंग प्रमाणपत्राकरिता १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. मकरंद यांनी तीही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविली. नंतर मात्र मकरंद यांना शंका आली. त्यांनी इंटरनेटवरून दिल्ली विमानतळ येथे संपर्क साधून चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी फिर्यादी मकरंद यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध नऊ महिन्यानंतर आयटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: London woman cheats Nagpur businessman by two and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.