सुरेश भट सभागृहासह परिसराचा ‘लूक’ बदलतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:34 AM2017-09-18T01:34:03+5:302017-09-18T01:34:17+5:30
नागपूर शहराच्या वैभवात भर टाकणाºया ७५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते होत आहे. या समारंभाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या वैभवात भर टाकणाºया ७५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते होत आहे. या समारंभाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. सभागृहाच्या सजावटीचे काम सुरू आहे. सोबतच परिसराच्या सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे.
सुटीचा दिवस असूनही रविवारी भट सभागृहासमोरील दुभाजक दुरुस्ती व झाडे लावण्यासाठी कुंड तयार करण्याचे काम सुरू होते. रेशीमबाग मैदानातील पाणी थेट सभागृहालगतच्या भागात जमा होते. यासाठी पावसाळी नाली बांधण्यात आलेली नाही. नालीचे काम हाती घेण्यात आले आहे.
तसेच सभागृहाच्या परिसरातील लॅन्ड स्केपींग, हिरवळ व रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती अद्याप महापालिका प्रशासनाला मिळालेली नाही. परंतु २२ सप्टेंबरला राष्ट्रपती नागपूर दौºयावर येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली आहे. त्यानुसार आयुक्त अश्विन मुदगल यांनी नियोजन केले आहे. राजभवन ते रेशीमबाग दरम्यानचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्याहस्ते सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच ते दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे जाणार आहे. त्यांचा दौरा विचारात घेता तयारी सुरू आहे.
हवाई मार्गाचा पर्याय
नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट रोड, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षेचा विचार करता राष्ट्रपतींच्या हवाई मार्गाचाही विचार सुरू आहे. सैन्याच्या हेलिकॉप्टरचा वापर करून ते ड्रॅगन पॅलेस व रामटेकला जाऊ शकतात.