लुटमार करणारे चाैघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:25+5:302020-12-04T04:27:25+5:30

कळमेश्वर : ट्रक राेडवर अडवून त्यातील दाेघांना लुटणाऱ्या चार आराेपींना कळमेश्वर पाेलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांनी त्या दाेघांना मारहाण ...

Looters arrested | लुटमार करणारे चाैघे अटकेत

लुटमार करणारे चाैघे अटकेत

googlenewsNext

कळमेश्वर : ट्रक राेडवर अडवून त्यातील दाेघांना लुटणाऱ्या चार आराेपींना कळमेश्वर पाेलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांनी त्या दाेघांना मारहाण करीत त्यांच्याकडून २२ हजार ८०० हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून हाेता. आराेपींकडून ७५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.

शुभम बलराम हरीणखेडे (२१, रा. उपरवाही, ता. कळमेश्वर), कुंदन गाैतम हिरे (२१, रा. कन्हान, ता. पारशिवनी) व राजा ऊर्फ राजू अशाेक पुसदकर (२२, रा. हुडकाे काॅलनी, कळमेश्वर) व राेहित बेनिराम डेहरिया (१८, रा. बजरवाडा, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपीची नावे आहेत. सचिन नत्थूजी गजभिये (३३, रा. नारी राेड, नागपूर) व पुष्कर राजपूत ट्रकमध्ये काेंबड्यांचे खाद्य घेऊन जात हाेते. या चाैघांनी त्यांचा ट्रक कळमेश्वर एमआयडीसी परिसरातील बायपास चाैकात गतिराेधकाजवळ अडविला.

त्यांनी सचिन व पुष्कर यांना मारहाण केली आणि सचिनकडून ७,८०० रुपये राेख, एटीएम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पुष्करकडून पाच हजार रुपये राेख व १० हजार रुपयांचा माेबाईल असा एकूण २२ हजार ८०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेत पळ काढला हाेता. या घटनेत शुभमचा सहभाग असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी आधी त्याला आणि नंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य तिघांना अटक केली.

त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची एमएच-३१/एस-३३३० क्रमांकाची माेटरसायकल, २० हजार रुपयांची एमएच-४०/एवाय-४१७१ क्रमांकाची माेटरसायकल, १० हजार रुपयांचा माेबाईल व ५,५०० रुपये राेख असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. त्यांच्याकडून चाेरी व लुटमारीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी व्यक्त केली.

Web Title: Looters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.