भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक आज : २४ तीर्थंकरांची निघेल भव्य अहिंसा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:40 AM2019-04-17T00:40:07+5:302019-04-17T00:42:21+5:30

भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर यूथ क्लबतर्फे आयोजित ही शोभायात्रा परवारपुरा जैन मंदिर, इतवारी शहीद चौक येथून सकाळी ७.३० वाजता निघेल. विविध मार्गांवरून जात शोभायात्रा सकाळी ९.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचेल. तेथे भगवान महावीर जन्मकल्याणक तसेच अभिषेक, पूजन क्रिया होईल.

Lord Mahavir's birth welfare today: 24 pilgrim's grand Ahimsa Yatra | भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक आज : २४ तीर्थंकरांची निघेल भव्य अहिंसा यात्रा

भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक आज : २४ तीर्थंकरांची निघेल भव्य अहिंसा यात्रा

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर यूथ क्लबतर्फे आयोजित ही शोभायात्रा परवारपुरा जैन मंदिर, इतवारी शहीद चौक येथून सकाळी ७.३० वाजता निघेल. विविध मार्गांवरून जात शोभायात्रा सकाळी ९.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचेल. तेथे भगवान महावीर जन्मकल्याणक तसेच अभिषेक, पूजन क्रिया होईल.
अहिंसा रथयात्रा महावीर यूथ क्लबचे केंद्रीय अध्यक्ष दिनेश सावलकर आणि केंद्रीय सचिव प्रशांत मानेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येईल. यात्रा संयोजक बाहुबली पळसापुरे, विशाल चाणेकर, सोनू सिंघई, संजय टक्कामोरे, श्रीकांत तुपकर, गौरव अवथनकार, नितीन रोहणे हेदेखील उपस्थित राहतील. जागोजागी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील तर मुख्य अतिथी म्हणून माजी खासदार अजय संचेती हे उपस्थित राहतील. सुश्रावक गुरुभक्त ध्वजारोहण करतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. गिरीश व्यास, माजी खासदार नाना पटोले, आ. सुधाकर कोहळे, सुमत लल्ला जैन, अर्चना विनय कुमार जैन, हस्तीमल कटारिया, दिलीप शांतिलाल जैन, सुभाष चंद जैन, प्रकाशचंद जैन, पुनित पोद्दार, इंदरचंद पाटणी, दिलीप रांका, सुनील रायसोनी हे उपस्थित राहतील. मंगलाचरण परवारपुरा महिला मंडळातर्फे करण्यात येईल. ध्वजगीत श्री सैतवाल जैन सामाजिक मंच महिला मंडळातर्फे सादर
करण्यात येईल.
शोभायात्रेचा मार्ग
श्री दिगंबर जैन परवार मंदिर,शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक , सुरेश भट सभागृह
अहिंसा पुरस्कार वितरण सोहळा आज
श्री जैन सेवा मंडळातर्फे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त अहिंसा पुरस्कारांचे वितरण बुधवारी सायंकाळी ७ वाजता करण्यात येईल. कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय जैन सेवा मंडळाच्या सदस्याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. यानंतर सुनील आगरकर व चमू भजनाचे सादरीकरण करेल.

Web Title: Lord Mahavir's birth welfare today: 24 pilgrim's grand Ahimsa Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.