गटबाजीने हरले; कार्यकर्त्यांनी तारले

By admin | Published: February 26, 2017 02:11 AM2017-02-26T02:11:01+5:302017-02-26T02:11:01+5:30

विकास कामाचे डबे घेऊन निघालेल्या भाजपाच्या ‘प्रगती एक्स्प्रेस’ ने नागपुरात १०८ जागांचा पल्ला गाठला.

Lose the grouping; Workers saved | गटबाजीने हरले; कार्यकर्त्यांनी तारले

गटबाजीने हरले; कार्यकर्त्यांनी तारले

Next

९५ जागी काँग्रेस दुसऱ्या नंबरवर अपयशाची शाई पुसणार कोण ? पक्षश्रेष्ठी घेणार का दखल ?
जितेंद्र ढवळे   नागपूर
विकास कामाचे डबे घेऊन निघालेल्या भाजपाच्या ‘प्रगती एक्स्प्रेस’ ने नागपुरात १०८ जागांचा पल्ला गाठला. त्यामुळे २९ जागा जिंकणाऱ्या आणि ९५ वॉर्डात (जागावर) दुसरा नंबर मिळविणाऱ्या काँग्रेसमध्ये गटबाजीची शाई कधी पुसली जाईल, असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
नागपूर महापालिकेत यावेळी किमान ६० जागांचा टप्पा गाठू, असा एक्झिट पोल काँग्रेसमधील सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे वर्तविला होता. मात्र जसजसा निवडणुकीचा पारा वाढत गेला, तसतशी गटबाजीची शाई अधिक घट्ट होत गेली आणि ती थेट पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावर पोहोचली. त्यामुळे आता कॉँग्रेसमध्ये आॅपरेशन क्लीन हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तिकीट कापाकापीच्या पतंगबाजीत कॉँग्रेस नेते व्यस्त असले तर शहरात काँग्रेसने किमान ६० जागांचा टप्पा गाठावा, यासाठी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता सतत लढत होता. महापालिका निकालाची आकडेवारीही तसे दर्शविते. यंदा पहिल्यांदाच काँग्रेसने मनपा निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावर लढली. चव्हाण यांची एक प्रचारसभा वगळता एकही मोठा नेता शहरात उमेदवाराच्या प्रचारासाठी आला नाही. नेते आले नाही म्हणून २९ नगरसेवक निवडून आले आणि

बसपालाही दिली टक्कर
उपराजधानीत मतविभाजनाचा फटका नेहमी काँग्रेसला बसत आला आहे. यावेळी ज्या प्रभागात बसपाचे उमेदवार निवडून आले आहेत तिथेही कॉँग्रेस दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये बसपाचे चारही उमेदवार निवडून आले. येथे प्रभाग क्रमांक ६(अ) आणि ६ (ब) मध्ये काँग्रेस दुसऱ्या तर ६ (क) आणि ६(ड) मध्ये तिसऱ्या क्रमाकांवरक राहिली आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये बसपाचे तीन तर कॉँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. येथेही ७(अ) आणि ७ (ब) मध्ये काँग्रेस दुसऱ्या ७(क) मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. हीच स्थिती प्रभाग क्रमांक ९ मध्येही कायम दिसते. येथे बसपाचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. येथेही प्रभाग क्रमांक ९(ब), ९(क) आणि ९(ड) मध्ये काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावरील स्थिती कायम आहे. त्यामुळे मतांचा हा ट्रेंड लक्षात घेता काँग्रेसला ‘ग्लुकोज’ची नाही तर ग्लुकोव्हिटाची गरज असल्याची मागणी सामान्य कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Web Title: Lose the grouping; Workers saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.