ऊस ताेडणी करार माेडल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:45+5:302021-03-22T04:08:45+5:30
माैदा : चाैघांनी कंपनीसाेबत केलेला ऊस ताेडणी करार मध्येच माेडल्याने कंपनीचे ३६ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. हा ...
माैदा : चाैघांनी कंपनीसाेबत केलेला ऊस ताेडणी करार मध्येच माेडल्याने कंपनीचे ३६ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार माैदा तालुक्यात नुकताच घडला असून, प्रकरण पाेलिसात पाेहाेचले आहे.
बाबदेव (ता. माैदा) येथील व्यंकटेश पाॅवर प्राेजेक्टच्या व्यवस्थापनाने संजय रेवन राठाेड व अन्य तिघांशी शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस ताेडणी व वाहतुकीसाठी करार केला हाेता. त्यासाठी व्यवस्थापनाने या चाैघांनाही ३६ लाख १९ हजार रुपये चेकद्वारे दिले हाेते. या चाैघांनीही ऊस ताेडणी न करता करार माेडला. शिवाय, घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे संजय इंद्रजीत गुजर यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ४०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार देशमुख करीत आहेत.