नागपूर मनपाच्या परिवहन विभागाला ६४ कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:46 AM2018-05-08T01:46:34+5:302018-05-08T01:46:44+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर्षात परिवहन विभागाचा खर्च १२२ कोटींचा असून, उत्पन्न ५८.१७ कोटींचे आहे. विभागाला ६४ कोटींचा तोटा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवकं
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर्षात परिवहन विभागाचा खर्च १२२ कोटींचा असून, उत्पन्न ५८.१७ कोटींचे आहे. विभागाला ६४ कोटींचा तोटा झाला आहे.
स्थायी समितीच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात याचा स्वतंत्र समावेश केला जाणार आहे. परिवहन समितीला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतरचा समितीचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. शहर बसची प्रवासीसंख्या वाढावी, यासाठी विविध योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. परिवहन समितीच्या बैठकीत सभापती बंटी कुकडे यांना व्यवस्थापक शिवाजी जगताप अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे अधिकार परिवहन समितीला आहे.
वंश निमय यांचा कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर महापालिकेने शहर बससेवा चालविण्यासाठी पाच आॅपरेटरची नियुक्ती के ली आहे. रेड बसची जबाबदारी तीन आॅपरेटरवर तर ग्रीन बससाठी स्वतंत्र आॅपरेटची नियुक्ती केली आहे. तसेच या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाचवा आॅपरेटर नियुक्त करण्यात आला आहे.
एप्रिल २०१७ पासून शहर बससेवेची जबाबदारी रेड बसच्या तीन आॅपरेटवर सोपविण्यात आली. सुरुवातीला काही महिने २४० बसेस शहरात धावत होत्या. टप्प्याटप्प्याने बससंख्या वाढविण्यात आली. आता ही संख्या ३८० झाली आहे. बससंख्या वाढली परंतु यासोबतच तोटाही वाढला आहे.
ग्रीन बसला प्रतिसाद वाढला
महापालिकेला परिवहन सेवा तोट्यात चालवावी लागत आहे. ग्रीन बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी ६ एप्रिलपासून भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रीन बसच्या प्रवाशात १४ टक्के वाढ झाली आहे. एप्रिलपर्यंत दर महिन्याला ग्रीन बसमधून ५० हजार प्र्रवासी प्रवास करीत होते. आता ही संख्या ७० हजारांवर गेली आहे.