प्रेयसीला प्रियकराने पळवून नेले

By admin | Published: May 8, 2016 03:00 AM2016-05-08T03:00:51+5:302016-05-08T03:00:51+5:30

एकदा शेवटची भेट घेण्याची गळ घातल्याने भेटायला आलेल्या प्रेयसीला प्रियकराने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास सिनेमॅक्ससमोर घडली.

Loved the lover of lover's beloved | प्रेयसीला प्रियकराने पळवून नेले

प्रेयसीला प्रियकराने पळवून नेले

Next

मित्राची तक्रार : सीताबर्डीत गुन्हा दाखल
नागपूर : एकदा शेवटची भेट घेण्याची गळ घातल्याने भेटायला आलेल्या प्रेयसीला प्रियकराने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास सिनेमॅक्ससमोर घडली. तरुणीच्या दुसऱ्या एका मित्राने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस आरोपी आणि तरुणीचा शोध घेत आहेत.
अंकित नानवाणी असे आरोपीचे नाव आहे. मूळची चिमूरजवळ राहणारी एक तरुणी त्याची प्रेयसी आहे. ती नागपुरात बी. फॉर्मला शिकते. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या संबंधात वितुष्ट आले. तेव्हापासून ते एकमेकांपासून दुरावले. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून अंकितने तिला वारंवार फोन करून भेटायला बोलविले. तू आली नाहीस तर आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. त्यानुसार, तरुणी आपल्या गावातील एका मित्रासह इटर्निटी मॉलजवळ गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास अंकितला भेटायला आली. या दोघांनी काही वेळ गप्पा केल्या. त्यानंतर अंकितने तिला आपल्या स्प्लेण्डरवर बसवून महाराज बाग मार्गे निघून गेला. हा प्रकार पाहून तरुणीच्या मित्राने सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)



३६ तासांपासून बेपत्ता
अंकित आणि ती तरुणी गेल्या ३६ तासांपासून बेपत्ता आहे. त्या दोघांचे मोबाईलसुद्धा बंद आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या वडिलांना बोलवून घेतले असून, त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. या दोघांच्या मित्र आणि नातेवाईकांकडेही चौकशी केली जात आहे.

Web Title: Loved the lover of lover's beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.