कोरोना रुग्णांची ग्रामीणमध्ये सर्वांत कमी नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:33+5:302021-07-07T04:09:33+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. ७,९९९ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ५,२३६, ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. ७,९९९ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ५,२३६, तर ग्रामीणमधील २,७५५ रुग्ण होते. त्यानंतर ७२ दिवसांनी सोमवारी ग्रामीणमध्ये सर्वांत कमी ३ रुग्णांची नोंद झाली. शहरात ११ रुग्ण आढळून आल्याने नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १४ झाली आहे. दोन दिवसांनंतर आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याने मृतांची संख्या स्थिरावली आहे.
नागपूर जिल्ह्यात सोमवारी सर्वांत कमी चाचण्या केल्या. ४,६४७ चाचण्यांमध्ये शहरातील ४,३६०, तर ग्रामीणमध्ये २८७ चाचण्या होत्या. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचा दर ०.३० टक्के होता. शहरात हाच दर ०.२५ टक्के, तर ग्रामीणमध्ये १.०४ टक्के होता. शहरात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ३,३२,६१६, तर मृतांची संख्या ५,२९८ झाली आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या १,४२,९८४, तर मृतांची संख्या २,३०६ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, आज २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ४,६८,०२६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.
- कोरोनाचे १२२ रुग्ण उपचाराखाली
विविध शासकीयसह खासगी रुग्णालयांत सोमवारी १२२ रुग्ण उपचाराखाली, तर ३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे १५२ रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील १३२, तर ग्रामीणमधील २० रुग्ण आहेत.
कोरोनाची सोमवारची स्थिती...
दैनिक चाचण्या : ४६४७
शहर : ११ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,७७,२०९
ए. सक्रिय रुग्ण : १५२
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,०२६
ए. मृत्यू : ९,०३१