डिजिटल व्यवहारासाठी एम अॅण्ड एम फायनान्सची मोहीम
By admin | Published: March 9, 2017 02:39 AM2017-03-09T02:39:30+5:302017-03-09T02:39:30+5:30
डिजिटल पेमेंटची साक्षरता देशात ५० लाख लोकांवर पोहोचविण्याचे महिन्द्र अॅण्ड महिन्द्र फायनान्स सर्व्हिसेस
अनुज मेहरा : सहा राज्यांमध्ये सुरू
नागपूर : डिजिटल पेमेंटची साक्षरता देशात ५० लाख लोकांवर पोहोचविण्याचे महिन्द्र अॅण्ड महिन्द्र फायनान्स सर्व्हिसेस (एम अॅण्ड एमएफएस) समूहाचे लक्ष असल्याची माहिती महिन्द्र ग्रामीण गृह फायनान्सचे (एमआरएचएफ) व्यवस्थापकीय संचालक अनुज मेहरा यांनी बुधवारी दिली.
पत्रपरिषदेत मेहरा म्हणाले, समूहाचे कार्यान्वयन ११ राज्यांमध्ये आहे. त्यापैकी सहा राज्यांमध्ये डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम दाखल केली आहे. या समूहात एम अॅण्ड एमएफएस, एमआरएचएफ, महिन्द्रा इन्शुरन्स ब्रोकर्स (एम अॅण्ड एमआयबी), एम अॅण्ड एम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (एम अॅण्ड एमएएमसी), एम अॅण्ड एम ट्रस्टी कंपनी (एम अॅण्ड एमटीसी) या पाच कंपन्यांचा समावेश आहे. ‘एमआरएचएफ’ने ११ राज्यांमध्ये ४.५० लाख लोकांना ४५०० कोटींचे कर्ज वितरण केले आहे. कंपनी गावकऱ्यांना छोटे गृहकर्ज देते. या कर्जाचा वार्षिक दर १४ ते १८ टक्के आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात मेहरा म्हणाले, नोटाबंदीनंतर कंपनीचा व्यवसाय मुख्यत्वे वसुली ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. पण सध्या स्थिती सामान्य आहे.
देशात नव्याने सुरू झालेल्या कॅशलेश अथवा लेश-कॅश अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कंपनीतर्फे डिजिटल पेमेंट मोहीम राबविण्यात येत आहे.
कंपनीचे १० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागाचा दौरा करून स्ट्रीट शो आणि पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे.
याशिवाय कंपनीतर्फे चेकची समस्या अथवा ई-वॅलेटद्वारे व्यवहार तसेच डेबिट व के्रडिट कार्डद्वारे व्यवहार कसा करायचा, या संदर्भात संपूर्ण माहिती ग्राहकांना देण्यात येत आहे. डिजिटल पेमेंटची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने १८००-२३३-५३३३ या टोल फ्री क्रमांकासह फ्री कॉल सेंटर सुरू केले आहेत. या माध्यमातून कुणालाही माहिती मिळणार आहे.
पत्रपरिषदेत एमआरएचएफचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी शांतनू रेगे आणि महाराष्ट्र प्रमुख विनोद शर्मा उपस्थित होते.(प्रतिनिधी)