चीनमध्ये बनलेली नागपूर मेट्रो अल्ट्रा मॉडर्न : बृजेश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:04 AM2018-11-23T01:04:11+5:302018-11-23T01:04:57+5:30

नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सीआरआरसी कंपनीतर्फे चीनच्या दालियान येथील प्लँटमध्ये एकूण २३ मेट्रो रेल्वे ( ६९ )कोचेस बनवण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या रेल्वेला (३ कोच) गुरुवारी हिरवी झेंडी दाखवून नागपूरसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी चीनवरून नागपूरच्या पत्रकारांशी थेट संवाद साधला.

Made in China, Nagpur Metro Ultra Modern: Brajesh Dixit | चीनमध्ये बनलेली नागपूर मेट्रो अल्ट्रा मॉडर्न : बृजेश दीक्षित

चीनमध्ये बनलेली नागपूर मेट्रो अल्ट्रा मॉडर्न : बृजेश दीक्षित

Next
ठळक मुद्दे एका महिन्यात येणार नागपुरात





लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सीआरआरसी कंपनीतर्फे चीनच्या दालियान येथील प्लँटमध्ये एकूण २३ मेट्रो रेल्वे ( ६९ )कोचेस बनवण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या रेल्वेला (३ कोच) गुरुवारी हिरवी झेंडी दाखवून नागपूरसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी चीनवरून नागपूरच्या पत्रकारांशी थेट संवाद साधला.
डॉ. दीक्षित म्हणाले, या रेल्वेमध्ये अल्ट्रा मॉडर्न असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात ही मेट्रो नागपुरात पोहोचेल. तसेच उर्वरित २२ मेट्रोही २०१९ च्या मधे किंवा शेवटपर्यंत पोहोचण्याचा विश्वास आहे. याप्रसंगी महामेट्रोच्या रोलिंग स्टॉक अ‍ॅण्ड सिस्टीम्स डायरेक्टर सुनील माथूर म्हणाले, वर्षाला १ हजार कोचेच बनवण्याची क्षमता असलेल्या दालियान प्लँटमध्ये पहिल्या मेट्रो रेल्वेसाठी येथील टीमने अथक परिश्रम घेतले. पहिली मेट्रो बनायला दोन वर्षे लागली. १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये े करार झाला होता.
ही मेट्रो आॅरेंज रंगाची आहे. यावर वाघाचे चित्र आहे. आतील आपात्कालीन दरवाजा एका साईडला लावण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे बचाव कार्य राबवतांना सोपे जाईल. याच्या खिडकीची लांबी आणि रुंदी अधिक आहे. त्यामुळे बाहेरचा नजारा सहजपणे पाहता येईल. एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणाºया गँग -वे-ची रुंदी सुद्धा अधिक आहे.
वजन कमी असल्याने होणार ऊर्जा बचत
महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जनककुमार गर्ग यांनी सांगितले की, आंध्रप्रदेशातून आणण््यात आलेल्या मेट्रो रेल्वेच्या एक्सेल लोडच्या तुलनेत चीनमधील मेट्रो ट्रेनच्या एक्सेल लोड (वजन) कमी म्हणजे १६ टन आहे. यामुळे विजेचा वापर कमीहोईल. एक्सेल लोडनुसारच मेट्रो ट्रॅक बनवण्यात आल्याने सिव्हील वर्कवरही कमी खर्च आला आहे. या ट्रेनच्या एका कोचची किमत ८.०२ कोटी रुपये आहे. जी देशभरातील मेट्रो कोचेसच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे. यावेळी महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.

३५ टक्के सुटे भाग भारत-जपानचे
गर्ग यांनी सांगितले की, चीनमध्ये बनलेल्या या मेट्रो ट्रेनमध्ये तीन हजारपेक्षा अधिक सुटे भाग लागले आहेत. त्यातील ३० ते ३५ टक्के सूटे भाग भारत आणि जपानमध्ये बनले आहेत. रेल्वेचा पेंटोग्राम भारतात बनून चीनमध्ये पाठवण्यात आला.

Web Title: Made in China, Nagpur Metro Ultra Modern: Brajesh Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.