४८ हजार मताधिक्याने मधुकर कुकडे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:33 PM2018-05-31T21:33:02+5:302018-05-31T21:33:25+5:30
भंडारा - गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.३१) जाहीर झाला. यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना एकुण ४ लाख ४२ हजार २१३ मते मते मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ तर भारिपचे उमेदवार अॅड.एल.के. मडावी यांना ४० हजार ३२६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुकडे यांना ४८ हजार ९७ मतांनी विजयी घोषित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा - गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.३१) जाहीर झाला. यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना एकुण ४ लाख ४२ हजार २१३ मते मते मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ तर भारिपचे उमेदवार अॅड.एल.के. मडावी यांना ४० हजार ३२६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुकडे यांना ४८ हजार ९७ मतांनी विजयी घोषित केले. कुकडे यांच्या विजयाची घोषणा होताच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळून व फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा केला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मते मोजण्यात आली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतमोजणीच्या एकूण ३४ फेºया होणार होत्या. पहिल्या फेरीपासूनच कुकडे यांनी आघाडी घेतली ती ३४ व्या फेरीपर्यंत कायम होती. कुकडे यांच्या विजयाची घोषणा होताच काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विजयी जल्लोष साजरा केला. या विजयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं, पीरिपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर कुकडे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. खासदार प्रफुल्ल पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी राज्य मंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, अनिल बावनकर आदींनी मधुकर कुकडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर भंडाऱ्यात विजयी रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उमेदवारनिहाय मिळालेली मते
मधुकर कुकडे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपा - ४ लाख ४२ हजार २१३
हेमंत पटले भाजप - ३ लाख ९४ हजार ११६
एन.के. मडावी भारिप - ४० हजार ३२६
(मधुकर कुकडे ४८ हजार ९७ मताधिक्याने विजयी झाले)