मध्यप्रदेशातील चौराईचे सहाही दरवाजे उघडले; नागपूरची पाणीकपात संपण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:07 PM2019-08-26T12:07:53+5:302019-08-26T12:08:15+5:30

चौराई प्रकल्प तुडुंब भरला असून, धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा वाढणार आहे.

Madhya Pradesh's Chaurai Dam opens its doors | मध्यप्रदेशातील चौराईचे सहाही दरवाजे उघडले; नागपूरची पाणीकपात संपण्याचे संकेत

मध्यप्रदेशातील चौराईचे सहाही दरवाजे उघडले; नागपूरची पाणीकपात संपण्याचे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे८० ते ८५ दलघमी पाणी पोहचणार तोतलाडोहमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची पाणी पातळी घटल्याने नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदा पावसाळ्यातही शहरात पाणीकपात करावी लागत आहे. विशेष म्हणजे हे प्रकल्प मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चौराई तुडुंब भरला असून, धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा वाढणार आहे. परिणामी पाण्याची होणारी कपातही बंद करण्यात येण्याचे संकेत मिळताहेत.
सध्या शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेकडून सांगण्यात येत आहे की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणीकपात नागरिकांना सहन करावी लागत आहे. सणासुदीच्या दिवसात पाणीकपातीमुळे लोकांची डोकेदुखी वाढली आहे. शहराला तोतलाडोह आणि कामठी खैरी या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ७०० मि. मी. पाऊस पडला आहे. जो सरासरीच्या ४३ मि. मी. ने कमी आहे. असे असले तरी पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह येथे २३.१ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १२.१ टक्के आहे. तोतलाडोह येथे आतापर्यंत २७३.०२ दलघमी पाणीसाठा आहे. त्यातून १२३.०२ दलघमी पाण्याचा उपयोग केल्या जाऊ शकतो. विशेष म्हणजे तोतलाडोहची क्षमता ११६६.९३ दलघमी आहे.
कामठी खैरीमध्ये ७७.७४ दलघमी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३८.७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. कामठी खैरीची पाणी क्षमता १८०.९८ दलघमी आहे. दोन्ही प्रकल्पात क्षमतेपेक्षा पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेला पाणीकपात करावी लागत होती. विशेष म्हणजे महापालिकेने २२ ऑगस्टपर्यंत पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. पण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने हा निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत घेण्यात आला आहे. पेंच जलशुद्धीकरण केंद्रातून शहरासाठी दररोज ४५० एमएलडी पाणी उचलण्यात येते. त्यातून शहराच्या ७० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. पेंच जलशुद्धीकरण केंद्राला तोतलाडोह येथून पाणीपुरवठा होतो.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तोतलाडोहच्या डेड स्टॉक १५० दलघमी वरून ५० दलघमीच्या खाली आला होता. १५ ऑगस्टपर्यंत चौराई धरणात ९० टक्के स्टॉक जमा झाल्याने त्या धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. चौराई धरणाची क्षमता ४२१ दलघमी असून चौराईचे जलस्तर सातत्याने वाढत आहे. २५ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजतापर्यंत १२.०९ टक्के जलसाठा जमा झाल्याची नोंद करण्यात आली होती. ही क्षमता १२३ दलघमी आहे. गेल्या वर्षी या काळात २३.१ टक्के एवढा जलसाठा होता. तोतलाडोह धरणाची क्षमता ११६६.९३ दलघमी आहे व सध्या येथे २७२.०२ दलघमी पाणीसाठा आहे. यापैकी १२३.०२ दलघमी उपयुक्त साठा आहे. तसेच नवेगाव खैरीमध्ये २७.२८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ३६.१९ टक्के एवढा होता. सध्या नवेगाव खैरीमध्ये ७७.७४ दलघमी पाणीसाठा आहे. यापैकी ३८.७४ दलघमी उपयोगात आणला जाउ शकतो. या डॅमची एकूण क्षमता १८० दलघमी आहे. १५ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील चौराई धरण ९० टक्के भरल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले होते. पुन्हा चौराईच्या धरणाची पाणी पातळी वाढल्याने आता सहाही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे चौराईतून ८० ते ८५ दलघमी पाण्याचा दररोज विसर्ग होणार आहे. त्यामुळे तोतलाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. परिणामी पाणी कपातीवरही अंकुश बसण्याचे चिन्ह आहे.

Web Title: Madhya Pradesh's Chaurai Dam opens its doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी