माेहफुलाची दारूभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:37+5:302021-04-28T04:09:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाेलिसांनी सावंगी (हेटी) शिवारात असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : पाेलिसांनी सावंगी (हेटी) शिवारात असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली असून, एकूण ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
सावंगी (हेटी) शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे सावनेर पाेलिसांच्या पथकाने या शिवाराची पाहणी केली. तिथे त्यांनी नाल्याच्या काठी दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. पाेलीस येत असल्याचे लक्षात येताच आराेपीने तिथून लगेच पळ काढला. त्यामुळे या कारवाईमध्ये कुणालाही अटक करण्यात आली नाही; मात्र पाेलिसांनी संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त करीत २ लाख ८८ हजार रुपये किमतीची ३,६०० लिटर माेहफुलाचा सडवा, १२ हजार रुपयांचे १५० किलाे माेहफुले, १२ हजार रुपयांचे १२ नग प्लास्टिक ड्रम, ९ हजार रुपयांचे नऊ नग लाेखंडी ड्रम, पाच हजार रुपयांचे पत्र्याचे डबे, एक हजार रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण ३ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. शिवाय, सडवा व इतर साहित्य नष्ट केले असून, ही दारूभट्टी मनीष पंडिया याची असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे, हवालदार कोकाटे, तायडे, तांगडे, मुळे, होमगार्ड यांच्या पथकाने केली.