गौळाऊ गोवंशाच्या संवर्धनासाठी माफसूचे सर्वोतपरी सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:10 AM2021-09-06T04:10:34+5:302021-09-06T04:10:34+5:30
नागपूर : गौळाऊ गोवंश हे विदर्भाचे भूषण आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी माफसू सर्वतोपरी सहकार्य करेल. गोपालकांना आवश्यक ते ...
नागपूर : गौळाऊ गोवंश हे विदर्भाचे भूषण आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी माफसू सर्वतोपरी सहकार्य करेल. गोपालकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल. तसेच गौळाऊ संबंधित विविध संशोधक व संस्थांनी केलेल्या संशोधनाचा आढावा घेऊन लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी दिली.
गौळाऊ पैदासकार संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन तळेगाव रघुजी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गलाट गुरुजी यांच्या हस्ते तर मेळाव्याचे उद्घाटन डॉ. पातूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र पशुचिकित्सा परिषदेचे डॉ. अजय पोहरकर, योजक संस्था पुणेचे डॉ. गजानन डांगे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता निम्नशिक्षण डॉ. सुनील सहातपुरे, महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचे डॉ. नितीन फुके, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रवीण तिखे, सरपंच प्रभा कालोकर उपस्थित होते. गवळी समाजाने आपली ओळख टिकवण्यासाठी प्रत्येक घरी किमान एक गौळाऊ गाय आदर्श पद्धतीने पाळण्याचे आवाहन गलाट यांनी केले. गौळाऊ ब्रीडर संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकर यांनी गौळाऊ संवर्धनासाठी गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नाचा आढावा सादर केला. संचालन प्रफुल्ल कालोकार यांनी, तर आभार गणराज गळहाट यांनी मानले. कार्यक्रमाला प्रसन्ना बंब, डॉ. पाठक, डॉ. भालेराव, सजल कुलकर्णी, अजिंक्य शहाणे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.