‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 09:56 AM2023-12-15T09:56:56+5:302023-12-15T09:58:39+5:30

ही माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Magel Tyala Shettale scheme will be expanded says Agriculture Minister Dhananjay Munde | ‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे

‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे

नागपूर : ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य धीरज देशमुख यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले, कृषी विभाग आणि रोजगार हमी योजना  या दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल.

कोकण क्षेत्रात शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके, नाना पटोले, ॲड. आशिष शेलार, भास्कर जाधव आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: Magel Tyala Shettale scheme will be expanded says Agriculture Minister Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.