नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:38 PM2018-03-29T22:38:38+5:302018-03-29T22:38:52+5:30

येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.

The magnificence of MaharajBagh of Nagpur has gone: Death of 'Jai' tigress | नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देप्राणिप्रेमींमध्ये हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.
आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना नोव्हेंबर २००८ साली मेडकी, जि. चंद्र्रपूर येथील जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली १० वर्षे या दोघी महाराज बाग प्राणिसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू अगोदरच झाला. जुईच्या मृत्यूनंतर जाई महाराज बागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली होती. परंतु ५ नोव्हेंबर २०१७ रोजी साप चावल्यामुळे ती आजारी पडली. महाराज बाग , कृषी महाविद्यालय प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून जाईला जिवंत ठेवले. १७ नोव्हेंबरला विविध तपासणी अहवालातून तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. महाराज बाग प्रशासनातर्फे तिच्यावर दिवसरात्र उपचार सुरु होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले. जाईच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. त्यानंतर तिला १२ मार्च रोजी मोठ्या पिंजऱ्यात हलविण्यात आले आणि आवश्यक ते उपचार सुरु केले. परंतु २५ मार्च रोजी तिची प्रकृती खाल्यावल्यामुळे तिला प्राणिसंग्रहालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. परंतु २९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान जाईचा मृत्यू झाला. या घटनेने महाराज बाग परिसरात शोककळा पसरली. सकाळी ११.३० वाजता तिचे शवविच्छेदन झाले. यावेळी डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, डॉ. सुनील बावस्कर, व डॉ. अभिजित मोटघरे उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर दुपारी १२.१५ च्या सुमारास प्राणिसंग्रहालय परिसरात जुईला अगी्न देऊन अंत्यविधी करण्यात आला.
अंत्यविधीच्या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी पार्लावार, प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजित मोटघरे, महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक दिनकर जीवतोडे, विशेष अधिकारी डॉ. सुभाष पोटदुखे, सहायक कुलसचिव आर.डी. चव्हाण, वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.
... म्हणून वाघाचा मृतदेह जाळला जातो
डॉ. बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ, चिता, भालू यासारखे वन्य प्राण्यांचा मृत्यूनंतर त्यांचे पोस्टमार्टम करून विसरा काढला जातो. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. या विसºयाच्या आधारावर प्राण्यांच्या मृत्यूची कारणे शोधली जातात. मृत्यूनंतर या प्राण्यांना जाळलेच गेले पाहिजे, असे आवश्यक नाही. परंतु वाघ, चिता आणि भालू यासारख्या वन्य प्राण्यांची स्किन, नखे, दात आणि शरीराचे इतर अंग हे अतिशय किमती असतात. खड्डा खोदून अंत्यसंस्कार केल्यास मृतदेह चोरून त्याची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून या प्राण्यांचा मृतदेह जाळला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘जान’ राहिली एकटी
चंद्रपूरच्या जंगलातून जाई व जुईला अतिशय नाजुक अवस्थेत महाराज बागेत आणण्यात आले होते. जुईलाही वाचवण्याचा बराच प्रयत्न झाला होतो. पण तिला वाचवता आले नव्हते. त्यानंतर जाई महाराज बागेत इतर वाघांसोबत राहू लागली. नंतर जुनैना येथे आईपासून दुरावलेल्या ‘ली’, जान आणि चेरी सुद्धा महाराज बागेत आल्या. यानंतर शिकाऱ्यांच्या जाळात फसून अपंग झालेला वाघ ‘साहेबराव’ यालाही महाराज बागेत आणण्यात आले. परंतु नंतर त्याला गोरेवाडा येथे पाठवण्यात आले. नंतर ‘ली’ ला साहेबरावसोबत गोरेवाडा जंगलात पाठवण्यात आले. आता जाईच्या मृत्यूनंतर ‘जान’ ही महाराज बागेत एकटीच राहिली आहे. तिला आता नवीन सोबती कधी व केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

Web Title: The magnificence of MaharajBagh of Nagpur has gone: Death of 'Jai' tigress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.