महा मेट्रो : महत्त्वाच्या कार्यांना मंजुरी, सीएमआरएसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:34 AM2019-02-17T00:34:55+5:302019-02-17T00:35:51+5:30
शहरात मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी महामेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओच्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आरडीएसओने अनेक महत्त्वाच्या बाबींना मान्यता प्रदान केली आहे. यामुळे रिच-१ कॉरिडोर अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच-३ अंतर्गत सुभाषनगर ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान होणाऱ्या प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यासाठी मेट्रो प्रशासन तयारीला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी महामेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओच्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आरडीएसओने अनेक महत्त्वाच्या बाबींना मान्यता प्रदान केली आहे. यामुळे रिच-१ कॉरिडोर अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच-३ अंतर्गत सुभाषनगर ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान होणाऱ्या प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यासाठी मेट्रो प्रशासन तयारीला लागले आहे.
आरडीएसओने दिलेल्या मंजुरीनुसार रिच-३ अंतर्गत येत असलेल्या लोकमान्यनगर ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनदरम्यान नागपूर मेट्रोचा प्रवासी वेग ताशी २५ कि.मी. निर्धारित करण्यात आला आहे. या दोन्ही स्टेशनमधील अंतर ५.६ कि.मी. इतके असून अप अॅण्ड डाऊन ट्रॅकवरदेखील हा वेग कायम राहणार आहे. याव्यतिरिक्त महामेट्रो नागपूरच्या २५ केव्ही एसी ट्रॅक्शन, विद्युत पुरवठा आणि स्कॅडा सिस्टीमला (सुपरवायजरी कंट्रोल आणि डेटा अॅक्विजिशन) मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
रिच-१ अंतर्गत येणाऱ्या अॅटग्रेड सेक्शनवर खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान नागपूर मेट्रो ट्रेनला ताशी ८० कि.मी. गतीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच खापरी स्टेशन ते काँग्रेसनगरदरम्यान अप आणि डाऊन ट्रॅकवर प्रारंभिक ऑक्सिलेशन ट्रायलसाठी ताशी ४० कि.मी. आणि इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टेंस (ईबीडी) ट्रायल्ससाठी ताशी ४५ कि.मी. गती नागपूर मेट्रोला प्रदान करण्यात आली आहे.
महामेट्रोच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ताशी ८० आणि ४० कि.मी. वेगासाठी गती प्रमाणपत्र आणि विविध वैशिष्ट्यांसाठी तांत्रिक मान्यतादेखील मिळाली. रिच-१ आणि रिच-३ या दोन्ही भागांमध्ये ऑक्सिलेशन ट्रायल केले जात आहे. आरडीएसओतर्फे मिळालेल्या परवानगीनंतर आता महामेट्रो सीएमआरएस (कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी) परीक्षणासाठी सुसज्ज झाले आहे.