महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी
By मंगेश व्यवहारे | Published: December 31, 2022 07:50 AM2022-12-31T07:50:22+5:302022-12-31T07:52:22+5:30
महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेवटच्या दिवशीही विधानभवनचा परिसर दणाणून सोडला.
मंगेश व्यवहारे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे.. राज्यपाल झाले भाज्यपाल, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा, चोर है चोर है राज्यपाल चोर है, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेवटच्या दिवशीही विधानभवनचा परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात विरोधकांनी सरकारचे व राज्यपालांचे बुजगावणे उभे केले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे सरकार त्वरित हाकला, अशी मागणी केली. आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड आदींचा सहभाग होता.
हे बुजगावणेरूपी सरकार गप्प बसलंय
राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रूपात दोन बुजगावणी आहेत. यांच्यासमोर भूखंड चोरतात, महापुरुषांचा अवमान होतो, तरी हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसलयं, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"