महाबीज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:28+5:302020-12-15T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. या पार्श्वभूमीवर महाबीजचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील मागणी करीत आहेत. या मागणीसाठी महाबीजच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासमक्ष अलीकडेच महाबीज कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन समस्या मांडल्या. महाबीज हे स्वायत्त महामंडळ असल्याने सातव्या वेतन आयोगानुसार द्यावयाच्या रकमेची तरतूद आधीच करून ठेवलेली आहे. यामुळे सरकार आपल्या तिजोरीवर भार टाकणार नाही, असे सांगण्यात आल्याची माहिती आहे. या आंदोलनात श्याम दिवे, प्रशांत गजभिये, संजय राऊत, सुभाष बागडे, यशवंत कामडी, महेंद्र कोल्हे, श्रीकांत वाघमारे, सी. टी. काकडे, लिमसे, खंडेलवाल, व्ही.व्ही. देशमुख आदी सहभागी झाले होते.