महाज्योतीतर्फे तेलबियांचे ५० क्लस्टर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 08:21 PM2022-01-14T20:21:41+5:302022-01-14T20:22:14+5:30

Nagpur News करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

Mahajyoti will have 50 clusters of oilseeds | महाज्योतीतर्फे तेलबियांचे ५० क्लस्टर होणार

महाज्योतीतर्फे तेलबियांचे ५० क्लस्टर होणार

googlenewsNext
ठळक मुद्देओबीसी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थानही महाज्योतीचा उद्देश

नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थान हा सुद्धा महाज्योतीचा मुख्य उद्देश आहे. त्या उद्देशाने करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. यात ओबीसी समाजातील बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

महाज्योतीतर्फे वाशीम, बुलडाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या सात जिल्ह्यात करडई या तेलबिया पिकांचे उत्पादन करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या सात जिल्ह्यातील ६,९४९ शेतकऱ्यांना १६,१६२ एकर क्षेत्राकरिता प्रति एकर ४ किलोप्रमाणे एकूण ६४६.६० क्विंटल बियाणे मोफत वाटण्यात आले आहे. या व्यवहारात ५ कोटी ११ लाख रुपये इतका नफा अपेक्षित आहे. या प्रकल्पातून तेलाचा ब्रांड तयार होईल. तसेच शेतकऱ्याला रब्बी हंगामाकरिता हमखास उत्पन्नाची सोय नेहमीकरिता प्राप्त होईल.

महाज्योतीचा निधी दुसरीकडे वळविला जात असल्याचा आरोप काही जण करताहेत पण हे चुकीचे आहे. मुळात ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल. एकूण ५० क्लस्टर तयार करण्यात येणार असून यापैकी १० क्लस्टर मी माझ्या मतदार संघात तयार केले तर काय चुकले? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महाज्योतीला केवळ सव्वा वर्ष झाले असून या सव्वा वर्षात मोठी मजल आम्ही मारली आहे. इतर योजनांमध्येही महाज्योती चांगले काम करीत असल्याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखविला. पत्रपरिषदेला महाज्योती संचालक मंडळाचे सदस्य दिवाकर गमे व डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित हाेते.

-उमरेड रोडवर होणार भव्य प्रशिक्षण केंद्र

शासनाने उमरेड रोडवर अडीज एकर जागा देऊ केली आहे. परंतु आम्ही २० एकर जागा मागितली आहे. या जागेवर महाज्योतीचे वसतिगृह व भव्य प्रशिक्षण केंद्र तयार केले जाईल. तसेच महाज्योतीच्या मुख्यालयासाठी सिव्हिल लाईन्स येथे ५ एकर जागा मागण्यात आली आहे. त्यासंदर्भातही लवकरच निर्णय होईल. यासोबतच पुढील शैक्षणिक सत्रात ७२ वसतिगृहे सुरू होतील, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Mahajyoti will have 50 clusters of oilseeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.