चार महिन्यानंतर महामेट्राेने सुधारली चूक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:08 AM2021-03-19T04:08:15+5:302021-03-19T04:08:15+5:30

नागपूर : महाराष्ट्र मेट्राे रेल्वे काॅर्पाेरेशनने चार महिन्यानंतर अखेर आपली चूक सुधारली. या सुधारणेमुळे वर्धा राेडवर बांधलेल्या डबलडेकर उड्डाणपुलावर ...

Mahametra corrects mistake after four months () | चार महिन्यानंतर महामेट्राेने सुधारली चूक ()

चार महिन्यानंतर महामेट्राेने सुधारली चूक ()

Next

नागपूर : महाराष्ट्र मेट्राे रेल्वे काॅर्पाेरेशनने चार महिन्यानंतर अखेर आपली चूक सुधारली. या सुधारणेमुळे वर्धा राेडवर बांधलेल्या डबलडेकर उड्डाणपुलावर वाहन चालविताना लागणारे झटके कमी झाल्याचे दिसून येत आहे. लाेकमतने सातत्याने हा मुद्दा लावून धरला हाेता. पुलावर लावलेले मॅस्टिक विरघळल्यानंतर झटके कमी हाेण्याची सबब दिली जात हाेती. मात्र महामेट्राेच्या अधिकाऱ्यांनी गुपचूपपणे दुरुस्तीचे काम करून ही समस्या साेडविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चाैकशी हाेणार की नाही, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

उल्लेखनीय म्हणजे महामेट्राेने वर्धा राेडवर ३.१५ किलाेमीटर लांब देशातील एकमात्र डबलडेकर पूल तयार केला आहे. रिब ॲन्ड स्पाईन तंत्रज्ञानावर आधारित पुलाचे गेल्या वर्षी नाेव्हेंबर महिन्यात लाेकार्पण झाले हाेते. या पुलावरून परवानगी नसताना माेठे ट्रक आणि ट्रेलरही चालविले जात आहेत. दरम्यान, या पुलावरून कार व इतर वाहनांनी जाताना झटके अनुभवास येत हाेते. या पुलाचे बांधकाम करताना स्लॅब म्हणजे एक्सपान्शन जॉईंट्स कमी अंतरावर म्हणजे २५,२८ आणि ३१ मीटर अंतरावर लावण्यात आले हाेते. ही स्लॅब असमताेल असल्याने वाहनचालकांना झटके लागत हाेते. त्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित केले जात हाेते. लाेकमतने तांत्रिक चुकीची माहिती घेत सातत्याने हा विषय मांडला.

मात्र पुलाचा सातत्याने उपयाेग वाढल्यानंतर डांबर, काेल, फायबर व गिट्टीचा वापर करून तयार केलेले मॅस्टिक विरघळून सपाट झाल्यानंतर झटके बंद हाेतील, असा दावा महामेट्राेकडून करण्यात येत हाेता. मात्र नाेव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या चार महिन्यात असे झाले नाही. दरम्यान, उन्हाळा सुरू झाल्यानंतर मॅस्टिक पिघळण्याची प्रक्रिया सुरू हाेईल, असेही सांगण्यात येत हाेते. मात्र महामेट्राेने आता त्यात सुधारकाम केल्याने झटके लागणे थांबल्याचे सांगण्यात येत आहे.

स्लॅबच्या जाेडणीवर सुधारकाम

मिळालेल्या माहितीनुसार, महामेट्राे प्रशासनाने पुलाच्या स्लॅबच्या जाेडणीवर सुधारकाम केले आहे. याअंतर्गत उष्ण डांबर, लाईम पावडर, राेबाे सँडचे मिश्रण स्लॅबच्या जाेडणीच्या आसपास टाकून उंच-सखल भाग समतल करण्यात आला. नुकतेच छत्रपतीनगर व उज्ज्वलनगर मेट्राे स्टेशनच्या बांधकामादरम्यान राेड ब्लाॅक करताना हे सुधारकाम करण्यात आले. याअंतर्गत पुलावरील वाहतूक अनेक दिवस रात्री बंद ठेवण्यात आली हाेती.

पीआरओला माहिती नाही

डबलडेकर पुलाचे दुरुस्ती कार्य झाल्याबाबतची माहिती महामेट्राेचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र असे काेणतेच काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मेट्राे स्टेशनच्या बांधकामासाठी काही दिवस रात्री वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुरुस्ती काम झाल्याची ठाेस माहिती पुरविल्यानंतर त्यांनी माहिती घेतली, तेव्हा असे कार्य झाल्याचे त्यांना समजले. यावरून मेट्राेचे अधिकारी पीआर विभागाला माहिती देत नसल्याने यावर प्रश्न निर्माण हाेत आहे.

Web Title: Mahametra corrects mistake after four months ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.