महामेट्रो : ३४० टन वजन ठेवून केले परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:14 PM2019-06-14T23:14:29+5:302019-06-14T23:15:10+5:30
महामेट्रो, नागपूर प्रकल्पाद्वारे सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर गुरुवार व शुक्रवारी लोड परीक्षण करण्यात आले. या कार्याच्या प्राथमिक परीक्षणात ४३ मीटर स्टील कंपोझिट गर्डर येथे १०० टन इतक्या रेतीच्या बॅग दोन्ही ट्रेनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच २४० टन एवढ्या वजनाच्या रेतीच्या बॅग ट्रॅकवर ठेवून ठरविण्यात आलेल्या संरचना आणि डिझाईन स्थिरतेच्या मापदंडानुसार तपासल्या गेल्या. त्यावर मेट्रो रेल्वेचे संचालन होणार आहे. गाडीच्या आत ट्रॅकवर ठेवलेल्या एकूण रेतीच्या पोत्यांचे वजन ३४० टन एवढे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रो, नागपूर प्रकल्पाद्वारे सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर गुरुवार व शुक्रवारी लोड परीक्षण करण्यात आले. या कार्याच्या प्राथमिक परीक्षणात ४३ मीटर स्टील कंपोझिट गर्डर येथे १०० टन इतक्या रेतीच्या बॅग दोन्ही ट्रेनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच २४० टन एवढ्या वजनाच्या रेतीच्या बॅग ट्रॅकवर ठेवून ठरविण्यात आलेल्या संरचना आणि डिझाईन स्थिरतेच्या मापदंडानुसार तपासल्या गेल्या. त्यावर मेट्रो रेल्वेचे संचालन होणार आहे. गाडीच्या आत ट्रॅकवर ठेवलेल्या एकूण रेतीच्या पोत्यांचे वजन ३४० टन एवढे होते.
मागील आठवड्यात ४ जून रोजी सीताबर्डी इंटरचेंज ते झिरो माईल मेट्रो स्टेशनदरम्यान ट्रायल घेण्यात आले होते. त्यावेळी मेट्रो रेल्वेचे संचालन क्रॉस ओव्हरपर्यंत करण्यात आले. म्हणजेच डाऊन मार्गाने जाणाऱ्या रेल्वेने अप मार्गावर प्रवास केला होता. शुक्रवारी झालेल्या परीक्षणानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत हे निश्चित झाले की, लवकरच अप आणि डाऊन ट्रॅकवर मेट्रोचा प्रवास सुरू होणार आहे.
मेट्रो रेल्वेचे परीक्षण शहीद गोवारी उड्डाण पुलावर तयार करण्यात आलेल्या स्टील कंपोझिट गर्डर येथे करण्यात आले. ज्यामध्ये दोन रेल्वे ट्रॅकवर आजूबाजूला उभ्या होत्या. उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकरिता हा कुतूहलाचा विषय ठरला. महामेट्रोतर्फे घेण्यात आलेल्या लोड परीक्षणाचे परिणाम सर्व निकषावर समाधानकारक आढळून आले.