महामेट्रो करणार नागपुरातील पाच मार्केटचा पुनर्विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:18 PM2019-01-15T22:18:07+5:302019-01-15T22:19:52+5:30
कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्यात आला. महाल येथील टाऊन हॉल येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वाक्षरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्यात आला. महाल येथील टाऊन हॉल येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वाक्षरी केली.
महामेट्रो नागपूर प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होत असल्याने आता महा मेट्रोकडे शहरातील इतर विकासकामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १९०१ साली उभारण्यात आलेल्या कॉटन मार्केट इमारतीचे ३०,००० रुपये खर्च करून १९२८ साली बांधकाम करण्यात आलेले होते. त्यानंतर १९६९ साली साली पुन:बांधकाम झालेल्या सध्याच्या कॉटन मार्केटसाठी सुमारे ७०,४२४.६३ चौरस मीटर, नेताजी मार्केटसाठी ७,३९३ .४० चौरस मीटर व १९३१ साली उभारण्यात आलेल्या गड्डीगोदाम स्थित गोलबाजारसाठी ६,२८९.९० चौरस मीटर इतक्या जागेवर व्यावसायिक प्रगतीसाठी विविध विकास कामे महामेट्रो करणार आहे.
करारानुसार इमारतीचा विस्तारित आराखडा, इमारत बांधकामाची योजना, वित्तीय योजना, दुकानांचे बांधकाम व इतर संबंधित सर्व कामाची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. या सर्व कार्यासाठी संबंधित जागा अटी व शर्तीवर महामेट्रोला हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेचे स्वामित्व महानगरपालिकेकडे असेल व विकास कार्य पूर्ण होताच महामेट्रो प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित करणार आहे.
यापूर्वी महामेट्रो आणि महापालिका यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘लंडन स्ट्रीट’च्या धर्तीवर शहरात तयार होणाऱ्या ‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’च्या प्रस्तावित जागेवर महामेट्रो आकर्षक मेट्रो मॉल तयार करणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण रूपरेखा तयार होण्यापूर्वीच पुन्हा अतिरिक्त कामाची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणार असल्याचा विश्वास महाोट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.