-तर वर्धा, भंडारा, रामटेक, काटोलपर्यंत महामेट्रो धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:47 AM2018-03-31T00:47:15+5:302018-03-31T00:47:26+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे रूळाचा उपयोग करून महामेट्रोतर्फे लोकल मेट्रो रेल्वे चालविण्यात येईल. यामुळे प्रवाशांची वेळेची बचत आणि त्यांना सर्वोत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे रूळाचा उपयोग करून महामेट्रोतर्फे लोकल मेट्रो रेल्वे चालविण्यात येईल. यामुळे प्रवाशांची वेळेची बचत आणि त्यांना सर्वोत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
लोकमतशी चर्चेदरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे. त्यांनी या मुद्दावर बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या संदर्भात महामेट्रो अधिकाºयांच्या निरंतर संपर्कात राहील.
२७ फेब्रुवारीला झालेल्या विविध विभागांच्या समीक्षा बैठकीत लोकल मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महामेट्रोतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार रेल्वे बोर्डाला दिला होता. प्रस्तावांतर्गत रेल्वेचे स्टेशन आणि रुळाचा उपयोग करून लोकल मेट्रो रेल्वे चालविण्याची महामेट्रोची योजना आहे. सध्या वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक आणि भंडारा या शहरांमध्ये नागपुरात पॅसेंजर धावते. पण त्याचा वेग फारच कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना संभाव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. याच मार्गावर मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर लोकल प्रति तास १२० कि़मी. वेगाने धावू शकते. वेळेच्या बचतीसह प्रवाशांना एसीमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळेल. वेळ कमी लागणार असल्यामुळे रेल्वेचा स्लॉट सहजरित्या मिळेल. या सेवेचा रेल्वेच्या नियमित सेवेवर काहीही परिणाम होणार नाही. या प्रकल्पासाठी महामेट्रो रेल्वेला स्टेशन आणि रूळाच्या उपयोगासाठी भाडे देईल आणि रेल्वेचा खर्च महामेट्रो वहन करेल. त्यामुळे रेल्वेला फायदा होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.