महामेट्रोच्या सीताबर्डी-झिरोमाईल-कस्तुरचंद पार्क या फ्रीडम पार्क रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 06:27 PM2021-08-20T18:27:49+5:302021-08-20T18:33:59+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क या 1.6 किमी लांब मार्गाचे उदघाटन शुक्रवारी दुपारी स्थानिक झिरो माईल येथे झाले .

Mahametro's Sitabardi-Zeromile-Kasturchand Park Freedom Park Railway Station Dedication | महामेट्रोच्या सीताबर्डी-झिरोमाईल-कस्तुरचंद पार्क या फ्रीडम पार्क रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

महामेट्रोच्या सीताबर्डी-झिरोमाईल-कस्तुरचंद पार्क या फ्रीडम पार्क रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देमहामेट्रोचे झिरो माईल स्टेशन आणि फ्रिडम पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तूनागपूर मेट्रो प्रकल्प स्वच्छ तसेच शाश्वत प्रारुप म्हणून सक्षम, केंद्रीय नगर विकास व पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महामेट्रोने नागपूरात स्थापन केलेले सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गिका तसेच फ्रीडम पार्क हे नागपूरच्या वैभवात भर टाकतील. नागपूरमध्ये जागतिक दर्जाची बरीच कामे होत आहेत. पहिल्यांदाच आपल्या देशात टू टायर मेट्रोची उभारणी महामेट्रोतर्फे करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क या 1.6 किमी लांब मार्गाचे उदघाटन शुक्रवारी दुपारी स्थानिक झिरो माईल येथे झाले . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून केंद्रीय मंत्र्यासोबत या मार्गिकेवर धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेलला झेंडा दाखवून रवाना केले. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नगर विकास सचिव डी.एस. मिश्रा , नागपूरचे पालकमंत्री आणि उर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित उपस्थित होते.

झिरो माईल स्टेशन येथे कॉटन मार्केट या स्थानावरून टॅफिक सिग्नलच्या अडथळ्याशिवाय पोहचण्यासाठी केंद्रीय रस्ते निधीमधून एक भुयारी मार्ग मंजूर करू असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी दिले. नागपूर शहरातील तेलंखेडी तलाव तसेच उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरण यामध्ये महामेट्रोची खूप मदत झाली असेही त्यांनी सांगितलं. मेट्रोच्या फेज दोनचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन चालू केले आहे . राज्याला आवश्यक तो सर्व निधी केंद्र सरकारतर्फे दिला जाईल मुंबई ठाण्याच्या विकासाकरिता अतिरिक्त १ लाख कोटी रुपयांचा निधी सुद्धा मुंबईच्या प्रस्तावित बैठकीमध्ये देण्याचं आश्वासन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेना यावेळी दिले.

जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. मेट्रो प्रकल्पाचे उन्नत -एलिव्हेटेड मार्ग तयार करताना या मार्गाच्या खालीसुद्धा सौंदर्यीकरण तसेच नागरिकांना काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष द्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विकास झाला पाहिजे पण त्यात कुठलीही उणीव किंवा कमतरता राहिली नाही पाहिजे याची खात्री आपण घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी सुद्धा पुढच्या 75 व्या वर्षापर्यंत टिकेल असे चांगलं काम आपण जनतेसाठी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .


मुंबई ते पुणे हे अंतर केवळ दोन तासात कापता येईल असा एक्सप्रेस हायवे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बांधला गेला. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीला व विकासाला कारणीभूत ठरेल , असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई आणि पुणे येथे देखील मेट्रोची ट्रायल रन सुरू झाली असल्याच शिंदे यांनी सांगितलं.


याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गिकेवर प्रवास करुन या मार्गिकेवर प्रवासी सेवेचा शुभारंभ केला. या उद्घाटन सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, महामेट्रोचे, महाराष्ट्र तसेच नागपूर जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Mahametro's Sitabardi-Zeromile-Kasturchand Park Freedom Park Railway Station Dedication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.