महानिर्मितीने गाठला १० हजारावर मेगावॅट वीज उत्पादनाचा पल्ला
By आनंद डेकाटे | Published: May 18, 2023 06:04 PM2023-05-18T18:04:39+5:302023-05-18T18:05:06+5:30
Nagpur News कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने आपल्या सर्व संसाधनांचे पुरेसे नियोजन केले आहे. त्यानुसार महानिर्मितीने बुधवारी १७ मे रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १००७० मेगावॅटचा पल्ला गाठला आहे.
आनंद डेकाटे
नागपूर : राज्यातील विजेच्या मागणीत उन्हाळ्यात अपेक्षित वाढ लक्षात घेऊन "मिशन औष्णिक ८००० मेगावॅट" चे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने आपल्या सर्व संसाधनांचे पुरेसे नियोजन केले आहे. त्यानुसार महानिर्मितीने बुधवारी १७ मे रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १००७० मेगावॅटचा पल्ला गाठला. यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १०१०२ मेगावॅटचा उच्चांक गाठला होता, हे विशेष. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे.
राज्यात यावर्षी सर्वोच्च विजेची मागणी एप्रिल महिन्यात २९ हजार मेगावॅटच्या घरात पोहचली. सध्या मागणी २८००० मेगावॅटच्या जवळ आहे आणि येत्या काही दिवसांत ती आणखीन वाढेल असा अंदाज आहे.