महानुभाव धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर

By Admin | Published: July 17, 2016 01:46 AM2016-07-17T01:46:37+5:302016-07-17T01:46:37+5:30

महानुभाव पंथीयांसाठी परमपवित्र असलेले धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर डिझाईन म्हणून वापरल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

Mahanubhipa Dharmasutra on Women's Clothing | महानुभाव धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर

महानुभाव धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर

googlenewsNext

समाजामध्ये रोष : आंदोलनाचा इशारा
नागपूर : महानुभाव पंथीयांसाठी परमपवित्र असलेले धर्मसूत्र महिलांच्या वस्त्रावर डिझाईन म्हणून वापरल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. शहरातील एका मॉलमध्ये धर्मसूत्र डिझाईन केलेले कपडे विक्रीस ठेवल्याने पंथीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महंत धुळधर बाबा यांनी केला.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी यांनी ८५० वर्षापूर्वी ही धर्मसूत्रे सांगितली होती. ही धर्मसूत्रे महानुभाव पंथीयांसाठी परमपवित्र मानली जातात. भाजयुमोचे पदाधिकारी अजय बोढारे यांनी सांगितले की, एक ा मॉल्समध्ये धर्मसूत्र लिहिलेले महिलांचे कपडे विक्रीसाठी ठेवले होते. समाजबांधव पायात चप्पल असताना ही धर्मसूत्रे उच्चारत सुध्दा नाही. मात्र शोरूममध्ये असलेल्या कपड्यांच्या पायावर येणाऱ्या भागावर ही सूत्रे लिहिल्या गेली आहेत. बोढारे यांनी सांगितले की, याबाबत माहिती मिळताच आम्ही संबंधित मॉलच्या व्यवस्थापकाला जाऊन भेटलो व त्यांना हे कपडे मॉलमधून हटवावे आणि डिझाईन करणाऱ्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी केली. त्यांनी हे कपडे हटविण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही दिवसात हेच कपडे दुसऱ्या शहरातील मॉलमध्ये आढळून आले. त्यामुळे एका ठिकाणी विरोध झाल्यास दुसऱ्या शहरात विक्रीला पाठविणे ही गंभीर बाब असल्याचे बोढारे यांनी सांगितले. कपड्यांवर धर्मसूत्रे छापणे ही विकृत मानसिकता असून मॉल संचालकाने संबंधित डिझायनरचे नाव जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान अहिंसेचा पुरस्कार करणारे आहे व समाज त्यानुसार मार्गक्रमण करतो आहे.
मात्र त्यामुळे आम्हाला भ्याड समजू नये, असा इशारा बोढारे यांनी यावेळी दिला. त्यामुळे मॉल चालकाने देशातील सर्व मॉलमधून हे कपडे हद्दपार करावे आणि हे कपडे निर्माण करणाऱ्याचे नाव जाहीर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mahanubhipa Dharmasutra on Women's Clothing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.