टायगर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराजबागेची बनेल साेसायटी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:49+5:302021-06-23T04:07:49+5:30
नागपूर : राज्यातील टायगर रिझर्व्ह क्षेत्रासाठी निर्मित फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रबंधनासाठीही साेसायटीची स्थापना केली जात आहे. या साेसायटीची ...
नागपूर : राज्यातील टायगर रिझर्व्ह क्षेत्रासाठी निर्मित फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रबंधनासाठीही साेसायटीची स्थापना केली जात आहे. या साेसायटीची नियमावली तयार करण्यात आली आहे. यासाठी देशातील पाच निवडक प्राणिसंग्रहालय आणि काही वाघ फाऊंडेशनच्या नियमावलीचा अभ्यास करण्यात आला. विधी तज्ज्ञ आणि व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना मागविण्यात आल्या. या प्रक्रियेला बराच कालावधी लागताे. याशिवाय केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडूनही आवश्यक विकासकामे न केल्यामुळे नाेटीस बजावण्यात येते. ही अडचण लक्षात घेता टायगर रिझर्व्ह फाऊंडेशनच्या धर्तीवर साेसायटीची स्थापना केली जात आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयातून मिळणारा महसूल व निधी साेसायटीच्या खात्यात जमा हाेईल. ही साेसायटी आपसात बैठक घेऊन आवश्यक विकास कार्यासाठी निधीचा उपयाेग करेल. अशा प्रकारच्या साेसायटीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेनेही मंजुरी प्रदान केली आहे.