Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:25 IST2019-10-21T18:24:17+5:302019-10-21T18:25:17+5:30
प्रत्यक्ष मतदान संपण्याच्या तासभर आधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या.

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदान
ठळक मुद्देसायंकाळी ५ वाजेपर्यंतची स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्यक्ष मतदान संपण्याच्या तासभर आधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या.
झालेले मतदान असे, काटोल ५२, सावनेर ५९.६९,हिंगणा ४९.०८, उमरेड ६२.५,दक्षिण पश्चिम नागपूर ४४.०५,दक्षिण नागपूर ४७, पूर्व नागपूर ४७, मध्य नागपूर ४६.८५,पश्चिम नागपूर ४२, उत्तर नागपूर ३९, कामठी ५२.१ आणि रामटेक ५८.
सर्वात कमी मतदान उत्तर नागपूर आणि सर्वात जास्त उमरेड विधानसभा मतदारसंघात झाले. सर्वत्र शांततेत पार पडत असल्याची माहिती आहे.