Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 08:53 PM2019-10-18T20:53:38+5:302019-10-18T20:54:03+5:30

डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

Maharashtra Assembly Election 2019: Banks system collapses during Manmohan Singh's tenure: Prakash Javadekar | Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधकांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याची टीका

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : संपुआ शासनकाळात शासकीय प्रणालीतून ‘फोनबँकिंग’ची वेगळीच व्यवस्था सुरू झाली. फोनवरच अनेकांची मोठमोठाली कर्ज मंजूर झाली. यातून बँकांच्या विविध घोटाळ्यांना सुरुवात झाली. डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश प्रवक्ता अर्चना डेहनकर, संजय भेंडे, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांत एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महायुतीला २२१ हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहेच. शिवाय काँग्रेस व विरोधकांची वैचारिक दिवाळखोरीदेखील सर्वांसमोर आली आहे. विविध मुद्यांवर विरोधकांचा गोंधळ आहे व ते नेमके कुठल्या बाजूला आहे हेच त्यांना सांगता येत नाही. ‘एनआरसी’संबंधात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच पुढाकार घेतला होता व आता काँग्रेसचेच नेते ‘एनआरसी’ला विरोध करत आहेत. ‘जीएसटी कॉन्सिल’मध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत व ते बैठकीत एकमताने काम करतात. बाहेर जाऊन मात्र ‘गब्बर सिंह टॅक्स’ असे म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक पक्ष सांभाळतात असे एकेकाळी म्हटले जायचे. आज त्यांना स्वत:चा पक्षदेखील सांभाळता येत नाही अशी स्थिती आहे, असे जावडेकर म्हणाले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावरदेखील आरोप केले. ‘पीएमसी’ बँक भ्रष्टाचारात पटेल यांच्या सहभागाचीदेखील चौकशी झाली पाहिजे. विदेशी विमान कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ‘एअर इंडिया’ला त्यांनीच रसातळाला नेले, असे ते म्हणाले. विदर्भाला मागील पाच वर्षांपासून न्याय मिळत असून विकासाची गंगा वाहते आहे. अशा स्थितीत वेगळ््या विदर्भाचा विषय मागे पडला आहे. मात्र विदर्भाबाबत जनसंघापासून आमची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.
राष्ट्रवाद हा निवडणुकांचा मुद्दा असेलच
राष्ट्रवादाचा मुद्दा हा निवडणुकांत अगोदरही होता व पुढेदेखील असेलच. सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेस नेते विनाकारण वक्तव्य देत आहेत. सावरकर यांच्यासंबंधात काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्याच पक्षाचा इतिहास तपासावा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले होते. तर सी.राजगोपालाचारी यांनी पुस्तक लिहीले होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Banks system collapses during Manmohan Singh's tenure: Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.