Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:35 PM2019-10-15T23:35:31+5:302019-10-15T23:36:54+5:30

विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला.

Maharashtra Assembly Election 2019: BJP sidelined with ED-CD support: Udit Raj | Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. उदित राज म्हणाले, सध्या देशाची आर्थिक स्थिती सर्वच क्षेत्रात प्रचंड खालावली आहे. ईडी, सीडी, भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेवरच भाजपा निवडणुकीत उतरली आहे. पी. चिदंबरम यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात फक्त एक मौखिक आरोप आहे. त्याव्यतिरिक्त काहीच नाही. विपक्षातील सर्व नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीडीचा वापर होत आहे. मध्य प्रदेशात संपूर्ण नेटवर्क उघड झाले,ज्यात आमदार सरकारच्या विरोधात असतील त्यांना फसविण्याचा डाव होता. एकप्रकारे हे ब्लॅकमेलिंगच आहे.
सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू आहे. हे सरकार त्यांना भारतरत्न देईलही. मात्र याच सावरकरांनी १३ ते १४ वेळा इंग्रजांकडे माफी मागितली होती, याचाही विचार व्हावा. इंग्रजांकडे माफी मागणाऱ्यांना भारतरत्न देण्याचा आग्रह होत असेल तर असा आग्रह करणारे खरे देशभक्त आहेत का, याचाही विचार व्हावा. भाजपाची मंडळी गांधींचे नाव घ्यायला लागली आहेत. मात्र त्यांना गोडसेही तेवढाच प्रिय आहे. ही दुहेरी नीती जनतेने ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. देशातील परिस्थितीबद्दल ते म्हणाले, आदिवासी आणि दलितांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे, या सरकारने सुरू केले आहे. आज देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे. सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. आरक्षण संपविण्याची तयारी सुरू आहे. दलितांना खासकरून प्रभावित केले जात आहे. खासगीकरण वाढविले जात आहे. रेल्वेसारखा विभाग विकायला काढला आहे. जी संसाधने काँग्रेसने उभी करून देश बळकट केला ती विकून भाजप हा देश चालवायला निघाली आहे. विकून असे किती दिवस काम चालविणार? भारताची अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसा नाही. जीओ आणून बीएसएनएलची परिस्थिती घसरविली, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माजी आमदार भगवतीप्रसाद चौधरी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता संजय दुबे उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: BJP sidelined with ED-CD support: Udit Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.