Maharashtra Assembly Election 2019 : संविधान हाच बसपाचा जाहीरनामा : सुरेश साखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:13 PM2019-10-12T23:13:09+5:302019-10-12T23:14:11+5:30
बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश साखरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीत राजकीय पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करतात. परंतु ते किती पूर्ण करतात हा प्रश्न आहे. बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश साखरे यांनी केले.
शनिवारी सकाळी पिवळी नदी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. धम्मानंदनगर, पाहुणे ले-आऊट, वनदेवी नगर, माजरी (आजरी), अरविंदनगर, पांडे वस्ती, संघर्षनगर, टिपू सुलतान चौक, शिवशक्तीनगर, गरीब नवाजनगर, पवननगर, यशोधरानगर मार्गे प्रवेशनगर येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब गोंडाणे, किशोर केतल, टी.पी. तिवारी, विरंका भिवगडे, वैशाली नानवरे, वंदना राजू चांदेकर, नरेंद्र वालदे, इब्राहीम टेलर, योगेश लांजेवार, पृथ्वी शेंडे, संजय जयस्वाल, बुद्धम राऊत, विलास सोमकुवर, महेश सहारे अतुल चव्हाण, तपेश पाटील. उमेश मेश्राम, रणजित सहारे, अक्षय जांभुळकर, विकास साखरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.