Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसमुळे बहुजन समाजाचे नुकसान झाले  : विवेक हाडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:54 AM2019-10-19T00:54:59+5:302019-10-19T00:56:11+5:30

. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

Maharashtra Assembly Election 2019: Congress wrecks havoc on Bahujan Samaj: Vivek Hadke | Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसमुळे बहुजन समाजाचे नुकसान झाले  : विवेक हाडके

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसमुळे बहुजन समाजाचे नुकसान झाले  : विवेक हाडके

Next
ठळक मुद्देरमाई मैदान जयताळा येथे जाहीर सभा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोनवेळा काँग्रेसमुळे पराभवाचा सामना करावा लागला. बाबासाहेबांना संविधान सभेत जाण्यापासून थांबविण्याबरोबरच हिंदू कोड बिलवरसुद्धा काँग्रेसने विरोध केला होता. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, बहुजन समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकरिता झटणार असल्याचे विवेक हाडके यांनी सांगितले.
रमाई मैदान जयताळा येथे अयोजित प्रचार सभेत हाडके भाजपावरसुद्धा ताशेरे ओढले. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन गेल्या पाच वर्षात फोल ठरले आहे. रस्ते आणि उड्डाण पूल बांधून भाजपा विकासाचे स्वप्न दाखवीत आहे. भाजप सरकारचे आरोग्य, रोजगार, शिक्षण याकडे कुठलेच लक्ष नाही. बहुजन समाजाने देशातील लोकांना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी होत असलेला त्रास लक्षात घेता, अशा तमाम शोषित, पीडित जनतेला न्याय देण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार तोडून काँग्रेसने आपल्या विचारधारेचा परिचय दिला आहे. आज दलित, आदिवासी, ओबीसी व उत्तर भारतीय लोकांना बसपाकडून मोठी अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बसपा पूर्ण प्रयत्न क रेल. आज सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती, जमातीचा मोठा बॅकलॉग आहे. तो बॅकलॉग भरण्याचा प्रयत्न बसपा करेल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे मिळत नाही. ते पूर्ण करण्याचा बसपा प्रयत्न करेल. या सभेला ससानंद जामगडे,सुनंदा नितनवरे, अशोक डोंगरे, उमेश हाडके, मनोज राहाटे, सुधीर कडू, कमल गजभिये, राकेश गजभिये, शैलेंद्र कराडे, शिवाजीराव देशकर, अजय डांगे, मेघा हाडके, देवमन पाखिडे, सुमंत गणवीर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Congress wrecks havoc on Bahujan Samaj: Vivek Hadke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.