Maharashtra Assembly Election 2019 : झेंडे, बॅनर, बिल्ले व दुपट्ट्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:54 PM2019-10-12T20:54:25+5:302019-10-12T20:56:04+5:30

विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे नऊ दिवस उरल्याने प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Demand for flags, banners, billas and dupttas | Maharashtra Assembly Election 2019 : झेंडे, बॅनर, बिल्ले व दुपट्ट्यांना मागणी

Maharashtra Assembly Election 2019 : झेंडे, बॅनर, बिल्ले व दुपट्ट्यांना मागणी

Next
ठळक मुद्देरणधुमाळी : नऊ दिवस उरल्याने प्रचाराला वेग : प्रचार साहित्याची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठलीही निवडणूक म्हटली की विविध राजकीय पक्षातील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारावर जोर असतो, तेवढाच प्रचार साहित्यावर सुद्धा असतो. विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे नऊ दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला आहे. बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमातून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहे. 


प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांसाठी राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक, बॅनर उपलब्ध केले जात आहे. आपापल्या पक्षाच्या किंवा सहकारी पक्षाच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयांमार्फत होत आहे.
शहरातील सर्व उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षाकडून वितरित केले जात आहे. काही पक्षाच्या उमेदवारांना पक्ष कार्यालयातून तर काहींना थेट उपलब्ध केले जात आहे. मतदार याद्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदारयाद्यांचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बूथनिहाय जबाबदाºया निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उमेदवारांचा स्वत:च्याही साहित्यावर खर्च
प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु साहित्याची कमतरता भासू नये यासाठी काही उमेदवारांनी स्वत: खर्च करून साहित्याची जुळवाजुळव केली आहे. अपक्ष व छोट्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचार साहित्यावर स्वत: खर्च करावा लागत आहे. मतदार आकर्षित होईल, अशा साहित्याची मागणी अधिक आहे.

प्रचार साहित्य थेट उमेदवारांकडे
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पक्षातर्फे झेंडे, बॅनर, जाहीरनामे, बिल्ले व दुपट्टे असे प्रचार साहित्य उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रचाराचे साहित्य शहर काँग्रेसच्या कार्यालयाकडे न पाठविता थेट उमेदवारांना पाठविले जात आहे. त्यामुळे प्रचार साहित्य वाटपाचा घोळ निर्माण होणार नाही. साहित्य कमी मिळाले वा मिळाले नाही, अशी ओरड होणार नाही.
डॉ. गजराज हटेवार, शहर काँग्रेसचे प्रधान महासचिव

प्रदेश कार्यालयाकडून साहित्य उपलब्ध
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. प्रदेश कार्यालयाकडून नागपूर येथील पक्ष कार्यालयाला प्रचार साहित्य पाठविण्यात आले आहे. विधानसभा संघनिहाय या साहित्याचे वितरण सुरू आहे. मागणीनुसार साहित्य उपलब्ध केले जात आहे.
आ. गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ते भाजपा

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Demand for flags, banners, billas and dupttas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.